Saturday, October 12, 2024
Homeक्रीडाविश्वखेळाडू सुनिल वाडेकर यांचे निधन !

खेळाडू सुनिल वाडेकर यांचे निधन !

औरंगाबाद : गोपाळपुर येथील रहिवाशी, किक बाॅक्सींग चँपियन, सुर्यभान स्पोर्टस् अॅकडमीचे प्रमुख सुनिल वाडेकर यांचे काल दिंनाक १६ जानेवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. २९ वर्ष वय असणारे सुनिल वाडेकर ओरंगाबाद शहरात नावाजलेले खेळाडू होते.

कीक बाॅक्सींग, मार्शल आर्ट या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके सुनिल वाडकेर यांनी मिळवली होती. रशिया, भुटान, नेपाळ, बांगलादेश, जपान इत्यादी देशात झालेल्या स्पर्धेत देशासाठी सुवर्ण, कास्यं इत्यादी पदके सुनिल वाडेकर यांनी मिळवली होती.

हेही वाचा ! पुरोगामी चळवळीवर शोककळा ! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन

घरची परिस्थिती अत्यंत नाजुक असतांनाही प्रचंड मेहनत आणि संघर्ष करुन क्रिडा क्षेञात मोठे नाव सुनिल वाडेकर यांनी कमवले होते.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पर्यावरण शास्ञ विभागातुन त्यांनी पदवी मिळवली होती. पर्यावरणाचा अभ्यासक असल्याने नेहमी पर्यावरणा बाबतीत अत्यंत हळवा स्वभाव सुनिल वाडेकर यांचा होता‌. पर्यावरणाचा होणारा विनाश थांबविण्यासाठी अनेक उपक्रमे त्यांनी ओरंगाबद शहारात राबिविले होते. 

स्वतः क्रिडा प्रमी व सुर्याभान क्रिडा अॅकडमीचे प्रमुख असल्याने त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण बाबतची जागृती सुनिल सातत्याने करत असे. मकर सक्रांतीच्या निम्मात्ताने पंतग आणि मंजामुळे जखमी झालेल्या पक्षीनां वाचवण्यासाठी काल परवा पर्यत सुनिल ने चळवळ चालविले होती. 

विशेषज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते 

नेहमी हसत मुख असणारे सुनिल हे विद्यार्थी दशेत SFI या विद्यार्थी संघटने सोबत जोडले गेले होते, विद्यार्थी प्रश्नावर अनेक आंदोलनात सुनिल सक्रिय पने सहभाग घेतला. लोक पर्यावरण मंच या पर्यावरणवादी संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते, पर्यावरणाच्या अनेक चळवळीत स्वतः आपल्या विद्यार्थीनां सामील करुन सुनिल वाडेकर सक्रियोने सहभागी राहत असे.

सुनिल वाडेकर यांच्या जाण्याने क्रिडा क्षेञात, पर्यावरण चळवळीत नक्कीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सुनिल यांच्या अवेळी जाण्याने त्याचे शेकडो विद्यार्थी त्यांच्या पालकांवर दुःखाचा डोगंर पसरला आहे.

नोकरीची संधीनवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !

आठ दहा, बार वर्षाच्या शेकडो विद्यार्थ्यांना सुनिल कराटे चे प्रशिक्षण देत होता. ओरंगाबाद शहारत एम.एस.एम गाउंड वर सुनिल वाडेकर यांचे कराटे  क्लास चालायचे. सुनिल च्या पाश्चात्य आई, वडील आणि एक छोटा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.

हेही वाचा ! ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे

संबंधित लेख

लोकप्रिय