Friday, March 14, 2025

‘कट प्रॅक्टिस’च्या हव्यासापोटी रुग्णाच्या जीवाशी खेळ ! मनसे उपाध्यक्षांनी जुन्नर आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला जाब !

नारायणगाव / रवींद्र पाटे : नारायणगाव शिवारातील वैदूवस्ती येथील रहिवाशी रामचंद्र लोखंडे यांना गेली १० ते १५ वर्षे ‘हरणीया’ या हा दुर्धर विकाराचा त्रास होत आहे. उपचारासाठी रुग्णाने उप ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र ग्रामीण रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केल्याने सदर रुग्णास जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले.

जुन्नर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला आवश्यक टेस्ट करण्यास सांगितले, मात्र रुग्णाने सर्व चाचण्या केल्यानंतर त्याला पुणे येथे उपचार घेण्यास सांगितले. ‘कट प्रॅक्टिस’साठी रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी मनसे उपाध्यक्ष मकरंद पाटे यांचेकडे केला असल्याने पाटे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारायणगाव येथील वैद वस्ती मधील रामचंद्र लोखंडे यांना गेली १० ते १५ वर्षे हरणीयचा त्रास व त्याची गोलाकार गाठ झाली आहे. ते नारायणगाव ला डॉक्टरकडे गेले असता त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया होईल असे सांगण्यात आले. त्या प्रमाणे ते जुन्नर ग्रामीण रुग्णालय येथे गेले पण त्यांनी विविध तपासणी करायला खासगी लॅब मध्ये लावलं, तिथे त्यांना २५०० ते ३०० रुपये खर्च आला. शिवाय त्यांना गेली ४ दिवस रोज नारायणगाव वरून यायला लावले. सर्व रिपोर्ट पाहिल्यावर नंतर जुन्नर चे डॉक्टर बोलत आहेत की, ही शस्त्रक्रिया येथे होऊ शकत नाही, पुण्याला जावे लागेल. आणि हे रिपोर्ट पण पुण्याला चालणार नाहीत, वास्तविक लोखंडे हे गरीब असून त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयाने फसवणूक केली आहे व नाहक खर्च करायला भाग पाडले आहे. लोखंडे यांनी याबाबत मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे यांना सांगितले. संबंधित अधिकारी यांच्याकडे मनसेच्या वतीने स्पष्टीकरण मागितले असता समाधानकारक उत्तर मिळाली नसल्याचे मनसे ने म्हटले आहे.

यावेळीमकरंद पाटे यांच्या सोबत महेश खरात, महेन्द्र फापाळे, आय्याज जमादार, अवधुत अष्टेकर, अनिल देशपांडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

तर यावेळी डॉक्टर म्हणाले, “ज्या तपासण्या सेंटर मध्ये उपलब्ध नाहीत, त्या बाहेरून कराव्या लागतात. तपासणी केलेले रिपोर्ट इतर ठिकाणी चालतील. आमचे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी बोलणे झाले आहे.”

Related Articles

- Advertisement -

Latest Articles