नायफड (खेड) : गुरुवार दिनांक १५ जुलै पासून ते १९ जुलै पर्यंत या कालावधीत “द आर्ट ऑफ लिव्हिंग” या संस्थेकडून १० हजार झाडे मिळवून नायफड गावातील शेतकऱ्यांना झाडांचे वाटप करण्यात आल्याची माहिती विकास भाईक यांनी दिली.
या वेळी संस्थेचे सदस्य दादासाहेब नवले, गारोले यांनी सहकार्य केले. गावातील तरुण कार्यकर्त्यांच्या विनंतीला संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व त्यांनी आंबा, पेरू, जांभळा, हिरडा, साग, लिंबोनी, शेवगा, रामफळ, सिताफळ, चिंच पपई, नारळ अश्या प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली.
झाडे वाटप करण्यासाठी युवा कार्यकर्ते राहुल दादा तिटकारे, रोहन भाऊ ठोकळ, युवराज तिटकारे, विकास ठोकळ, श्याम मिलखे तसेच आदिवासी युवा मंच नायफडच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. व ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे यांनी झाडांचे संगोपन कसे करावे, त्यासाठी कुंपण कसे असावे याचे मार्गदर्शन केले. यावेळी गावचे माजी सरपंच दत्तात्रय तिटकारे हे उपस्थित होते.