Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी : काळाच्या गरजेनुसार उपेक्षित, दुर्बल युवती, महिलांचे सबलीकरण करू – प्रा.दिपक जाधव

---Advertisement---

पिंपरी : शहरातील गोर गरीब जनतेचे भाकरीचे प्रश्न करोना महामारीमुळे अतिशय तीव्र झाले होते. नोकरी, व्यवसायावर गंडांतर आले होते. चुली विझलेल्या होत्या. भाकरीच्या चंद्राची आस सर्वाना पडत होती. त्या संकट काळात आमचे कोचिंग क्लास बंद पडले होते. आम्ही दाम्पत्याने गोरगरिबांना घास मिळवून देण्यासाठी धनवंत, समृद्ध नागरिकांना मदतीचे आवाहन केले. शहरातील कष्टकऱ्यांच्या संघटना, बचत गटातील संवेदनशील यांच्या सहकार्याने विविध स्वयंसेवी (NGO) संस्थांमार्फत मिळालेला किराणा, शिधा धुणी भांडी करणाऱ्या महिलांच्या घरात पोचवण्याचे काम केले. असे  प्रा.दिपक जाधव यांनी पिंपरी येथील कौशल्य कार्यशाळेचे महत्व सांगताना प्रतिपादन केले.

---Advertisement---

वय वर्षे १८ ते ३० वयोगटातील दुर्बल घटकातील युवती आणि महिलांना संगणकावरील माहितीचे आदान प्रदान, ग्राहकसेवा, मार्केटिंग, टेली कॉलिंग, डाटा एन्ट्री, बिलिंग, इंनसोअरसिंग, फोन बँकिंग, बॅक ऑफिस, लँग्वेज ट्रान्सलेशन, टेली कॉल रिस्पॉन्स, कस्टमर सपोर्ट, एक्सटेंडेड एक्सेल, वर्ड फाईलिंग, अपडेटेड इमेलिंग इ सर्व प्रकारचे ४५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना किमान मासिक उत्पन्न देण्याची योजना विप्ला फाउंडेशन आणि एचएसबीसी (HSBC) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प प्रमुख जैद कापडी आणि प्रकल्प समन्वयक विनोद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवल्या जातात.

या प्रशिक्षण केंद्राच्या प्रवर्तक प्रा.वैशाली गायकवाड यांनी सांगितले की, आता करोनाची लाट ओसरत आहे. बँकिंग, मोबाईल कंपन्या, लघु सूक्ष्म, मध्यम आस्था पना, फायनान्स, रिटेल शॉपी, शो रूम्स, मॉल ई ठिकाणी संगणक कौशल्ये (SOFT SKILLS), मास कम्युनिकेशन इ गरजेनुसार आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. १८ ते 30 वयोगटातील इयत्ता १० आणि पुढे शिकलेले कोणत्याही शाखेच्या उत्तीर्ण, अनुत्तीर्ण युवती आणि महिलांना गेल्या वर्षभरात प्रशिक्षित केले आणि त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील घरामध्ये उत्पन्न सीमित असते, त्याच घरातील एक प्रशिक्षित मुलगी कामाला जाऊन पैसे मिळवू लागली तर त्या स्वयंपूर्ण होतील. मदतीचे ओघ आता आटतील, तो एक वाईट कालखंड होता, त्यांना उपाशी राहू देणार नाही, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रशिक्षणाचा लाभ गरजू पर्यंत पोचवण्याचे कार्य करावे असे प्रा. गायकवाड म्हणाले.

पिंपरी येथील या औपचारिक बैठकीस श्रमिक संघटनांचे सलीम सय्यद, शैलजा कडुलकर, शेहनाज शेख, सुषमा इंगोले, दिलीप पेटकर, गौस सय्यद, महंमद शेख इ प्रतिनिधी हजर होते. 

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles