Friday, April 19, 2024
Homeजिल्हापिंपरी : पर्यावरण रक्षणासाठी फेरीवाल्यांचा पुढाकार, शहरात विविध ठिकाणी केली जनजागृती

पिंपरी : पर्यावरण रक्षणासाठी फेरीवाल्यांचा पुढाकार, शहरात विविध ठिकाणी केली जनजागृती

पिंपरी : नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील फेरीवाल्यांमध्ये ‘पर्यावरण वाचवा, पर्यावरण जगवा आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा’ अशा प्रकारचे फलक घेऊन  पर्यावरणाची वाचवण्यासाठी  जनजागृती  करण्यात आली यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, अंबालाल सुकलाल, ओमप्रकाश मोरया ,राजेश माने, सलीम डांगे, हरी भोई, रामा बिरादार ,मनोज गुप्ता, आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते  म्हणाले, “पर्यावरण आणि मानवाचे नाते अतूट आहे, या विषयास अनुसरून नॅशनल हॉकर फेडरेशनने देशभरामध्ये फेरीवाला मध्ये जनजागृती करून कोळसा न वापरण्याचे आवाहन करत आहे. त्याचबरोबर फेरीवाल्यांच्या ठिकाणी असलेल्या वृक्षाचे संवर्धन करणे व वृक्ष लागवड करणे याही बाबी यामध्ये येत आहेत.   

हवा, पाणी, वृक्ष, जमीन याचा एक नैसर्गिक समतोल आहे आणि असला पाहिजे याचे जतन करून पुढील पिढ्यांसाठी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, मानवाच्या अति हव्यासापोटी या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे निसर्गचक्र असंतुलित होण्यात मानवच  कारणीभूत आहे, असेही नखाते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “कृत्रिम विकासामुळे निसर्गापासून आपण दूर जात आहोत हे थांबलं पाहिजे यासाठी राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरामध्ये आणि राज्यांमध्ये आज हे पर्यावरण जनजागृतीचे अभियान राबविण्यात येत आहे, याला शहरातील सर्व विक्रेत्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे.”


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय