पिंपरी : भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी च्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले. घरकुल शाखेचे सेक्रेटरी म्हणून अविनाश लाटकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी या अधिवेशनाचे उद्घाटन कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केले. उद्घाटन प्रसंगी अभ्यंकर यांनी पक्ष व पक्षशिस्त व संघटन बांधणी संदर्भात मत व्यक्त केले. त्याच बरोबर पुणे जिल्ह्याचे पक्षाचे सेक्रेटरी नाथा शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले.
घरकुल ही साडेसहा हजार घरांची कामगार नगरी कार्यकर्त्यांच्या व जनसंघटनांच्या कष्टाचे फळ आहे असे उद्गार कॉम्रेड नाथा शिंगाडे यांनी काढले.
अधिवेशनानंतर जनजागृती रॅली काढून शाखेच्या बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर सेक्रेटरी गणेश दराडे यांनी घरकुलचा लढाईचा इतिहास सांगितला व त्यांनी येत्या काळात स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे उपस्थित सभासदांना आवाहन केले.
यावेळी ख्वाजा जमखाणे, सचिन एम. आर., स्वप्निल जेवले, संजय ओव्हाळ, एस. के. ओनाप्पण, सतीश नायर, अनिरुद्ध चव्हाण, सुषमा इंगोले, निर्मला येवले, अविनाश लाटकर, रंजीता लाटकर, अपर्णा दराडे हे उपस्थित होते.