Wednesday, February 5, 2025

पिंपरी चिंचवड : सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश मागे घ्या – भाई विशाल जाधव

पिंपरी चिंचवड : सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी बाराबलुतेदार महासंघ महाराष्ट्र चे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  

निवेदनात म्हटले आहे की, सलून व्यावसायिकास प्रत्येकी मासिक १० हजार रुपये अनुदान बँक खात्यात जमा करुन मुलांची शाळा फी, लाईट बिल, भाडे तत्वा वरील घर व दुकान भाडे व शासकीय कर माफ करावे किंवा शासनाने सलून व्यावसायिकांचे उपजीवकेची व्यवस्था करावी अन्यथा सलून व्यवसाय बंद आदेश मागे घ्यावेत

राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणे उद्देशाने सलून व पार्लर व्यवसाय दि.५ एप्रिल २०२१ ते दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सलून व्यावसायिक हा पूर्णपणे हातावर पोट असलेला व्यावसायिक आहे. सदर शासनाने सलून व पार्लर व्यवसाय बंद करणे आधी कर्नाटक, गुजरात  सरकार च्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना प्रत्येकी मासिक अनुदान देऊन मगच बंदचा आदेश काढवा, अशीही मागणी केली आहे.

तसेच लॉकडाऊन काळातील दुकान व घर भाडे, लाईट बिल, महानगर पालिका, ग्रामपंचायत गाळ्यांचे दुकानाचे घराचे कर माफ करावे. मगच खुशाल सलून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय किंवा आदेश हा काढावा, अन्यथा इतर व्यवसायिका प्रमाणे सलून व्यावसायिकांस शासन नियमावलीने सोमवार ते शुक्रवार स.७ ते रात्री ८ वाजे पर्यंत व्यवसायची परवानगी द्यावी व आपला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी. करण्यात आली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles