Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी चिंचवड : असंघटित कामगर काँग्रेस तर्फे मोदी सरकारचा निषेध !

---Advertisement---


पिंपरी चिंचवड
 : आज असंघटित कामगर काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे प्रांताध्यक्ष नाना पटोले  तसेच प्रदेशाध्यक्ष बदरूज्जमा मार्गदर्शनाने आज दि. 30 मे रोजी केंद्रातील मोदी शासनास 7 वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने निषेध आंदोलन करण्यात आले.

---Advertisement---

मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. मोदी सरकाच्या निषेध करण्यासाठी पिंपरी येथील संपर्क कार्यलया समोर काळ्या फिती बांधून तसेच मोदी सरकारच्या अपयशच्या मुद्द्यांचे फलक हातात घेवून निदर्शने करण्यात आल्याची माहिती असंघटित कामगर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिली.

कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा, कोरोनाच्या दुस-या लाटेला रोखण्यात अपयश, लसीकरणात आलेले अपयश, पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि महागाई, देशभर ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेली देशाची दुर्दशा, संपूर्ण देशातील वाढती बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की, मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला असल्याचीही टिका कांबळे यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश घरेलु महिला कामगार काँग्रेसच्या समन्वयक शितल कोतवाल, भीमशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदिप कांबळे,  जिल्हा समन्वयक सोशल मिडीया विभागाचे मोहन उनवणे, फुले, शाहु, आंबेडकर हौसिंग सोसायटीचे चेअरमन अशोक गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आशुतोष चंदनशिवे, देवीदास साळवे, दिलीप गायकवाड, अर्चना कांबळे, सोनाली म्हसकर हे उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles