पिंपरी चिंचवड : असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस असंघटित कामगार काँग्रेस चे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त असंख्य असंघटित कामगारांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
आकुर्डी : दत्तवाडी येथे माकपच्या वतीने शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय सुरू
तसेच यावेळी अखिल भारतीय असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष उदित राज व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहंमद बद्रुजमा यांच्या आदेशानुसार डिजिटल सभासद नोंदणी सुरू करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला असंघटित कामगार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शितलताई कोतवाल, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, भीमशक्ती संघटनेचे चेअरमन अशोक गायकवाड, फुले-शाहू-आंबेडकर हाउसिंग सोसायटीचे वसंत कदम, वृषाली कदम, भारती शिरसागर, वंदना आराख व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार
पिंपरी चिंचवड : होकर्स युनियन चे महानगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन
पिंपरी चिंचवड : मधुकर बच्चे युवा मंच वतीने शिवजयंती साजरी !