Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

रेड अलर्ट जारी केल्याने ‘या’ शहरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

पुणे : सलग चार दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी, चिखली, चिंचवड, काळेवाडी, राहटणी, भूमकर चौक, वाकड या शहरातील प्रमुख उपनगरातील रस्ते जलमय झाले आहेत. पुण्यात देखील धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस दोन्ही शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

---Advertisement---

मागील तीन दिवस पुणे शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. सध्याच्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक समस्यांना सामोरसुद्धा जावं लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना देखील घडत आहे. शाळकरी मुलांची सुरक्षा लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

मावळ खोऱ्यात गतवर्षी पेक्षा ४०० मि.मी. पाऊस अतिरिक्त पडला आहे. पवना आणि इंद्रायणी या प्रमुख नद्याना पूर आला आहे. मनपाचा पूरस्थिती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

---Advertisement---

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles