Sunday, December 8, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : हजारो लोकांचे जीव वाचवले, मनपाची कौतुकास्पद कामगिरी - गणेश...

पिंपरी चिंचवड : हजारो लोकांचे जीव वाचवले, मनपाची कौतुकास्पद कामगिरी – गणेश दराडे

कुशल मनुष्यबळ, जीवरक्षक औषधांचे नियोजन करा

 

पिंपरी चिंचवड : हजारो लोकांचे जीव वाचवले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कौतुकास्पद कामगिरी असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव गणेश दराडे म्हणाले. तसेच कुशल मनुष्यबळ, जीवरक्षक औषधांचे नियोजन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत २३ मे रोजी बोलत होते. यावेळी अशोक वाघिकर, सतीश नायर, अपर्णा दराडे, अमिन शेख, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, ख्वाजा जमखाने, शेहनाज शेख, स्वप्निल जेवळे उपस्थित होते. 

गणेश दराडे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून हजारो लोकांना जीवदान दिले आहे.जानेवारी ते मार्च या काळात सरासरी 2300 बाधित रुग्णवाढ होती. आरोग्य विभागातील 2/3 कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी या काळात वायसीएम सह इतर हॉस्पिटल मध्ये सेवा देत होते.

 

केंद्र आणि राज्य सरकारांच्या विवादात ऑक्सिजन, जीवरक्षक औषधे, इंजेक्शन याचा तुटवडा आणि कामाचा ताण प्रचंड होता आहे, असेही दराडे म्हणाले. देशातील सर्वात मोठ्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असतानाही मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी  हजारो नागरिकांना जीवदान दिले आहे. त्याना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दुसरी लाट ओसरली तरी नागरिकांनी नियम पाळलेच पाहिजे. केंद्र सरकारने औद्योगिक शहरातील संपूर्ण 26 लाख लोकसंख्येचे पूर्ण लसीकरणाची आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, अँटी इन्फेक्शन किट्सचा त्वरित पुरवठा करावा. आकुर्डी, थेरगाव येथील नवीन दवाखाने आणि इतर सर्व मूलभूत आरोग्य सेवा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत, त्याचे पूर्ण व्यवस्थापन मनपाच्या कर्मचाऱ्यांंमार्फतच व्हावे. कोव्हीड सेंटर आणि आरोग्य सेवेच्या योजना मधील ठेकेदारांच्या लॉबीपासून मनपाने आरोग्य सेवा दूर ठेवावी, जनआरोग्य, त्याचे मूलभूत संविधानिक उद्दिष्ट याबद्दल सर्वोच न्यायालयाने अनेक निवाडे दिले आहेत, त्याचा प्रशासनाने अभ्यास करून संसर्गजन्य आजार आणि इतर साथीचे आजार यापासून नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी लोकाभिमुख व्यवस्थापन करावे, असेही दराडे म्हणाले.


संबंधित लेख

लोकप्रिय