Thursday, March 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : शासकीय व मनपा आरोग्य सेवा गरीबापर्यंत पोचवण्याचे काम जन...

पिंपरी चिंचवड : शासकीय व मनपा आरोग्य सेवा गरीबापर्यंत पोचवण्याचे काम जन चळवळीतील कार्यकर्त्यानी करावे – डॉ. किशोर खिल्लारे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगर पालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध उपचार, शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन इत्यादी आरोग्य योजना गरीबापर्यंत पोचवण्याचे काम जन चळवळीतील कार्यकर्त्यानी करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण (YCM) वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.किशोर खिल्लारे यांनी आकुर्डी येथील कार्यक्रमात केले.

 

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) जनवादी महिला संघटना पिंपरी चिंचवड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवा निमित्त व्याख्यान आयोजित केले होते.

पिंपरी चिंचवड मनपाची एकूण सात रुग्णालये व एक सुपर स्पेशालिटी शैक्षणिक रुग्णालय आहेत. ह्या रुग्णालयात नागरिकांना विविध तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी सह विविध आजारांवर चांगले उपचार केले जातात. अशक्तपणा, ऍनिमिया, ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, पित्त, वात, तथा साथीचे आजार, बालकांचे व गरोदर स्त्रियांचे लसीकरण, अपंग, व्याधिग्रस्त जेष्ठ नागरिक, दमा, उच्च रक्त दाब, मधुमेह, गुडघे, कंबर दुःखी शस्त्रक्रिया यासारख्या बहुसंख्य आजारावर  अत्यल्प दरात उपचार केले जातात. महागड्या औषधी गोळ्या, टॉनिक अत्यल्प दरात दिले जाते. महाराष्ट्र राज्यात पिंपरी चिंचवड मनपाच्या आरोग्य विभागाचे काम  चांगले आहे.

त्यामुळे पदव्यूत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात पुणे जिल्हा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील  स्थलांतरित कामगार, शेतकरी, शेतमजूर व त्यांचे नातेवाईक येथे उपचारासाठी येतात. आयसीयु मध्ये ‌अत्यंत गंभीर रूग्णावर उपचार केले जातात.

तज्ञ अध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, परिचरिका तसेच सार्वजनिक – खाजगी भागीदारीत सिटी स्कॅन, एमआरआय व हृदयविकार उपचार सुविधा मनपाकडे उपलब्ध आहेत. जनआरोग्य योजनांची माहिती वस्ती पातळीवर पोचहवा, असे आवाहन डॉ.किशोर खिल्लारे यांनी केले आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री मातृवंदना व जननी सुरक्षा योजनांची माहिती या विषयावर व्याख्यान देताना ते म्हणाले की, दुर्धर आजारासाठी राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आहे.

नेत्र, अस्थी, पोट, जठर, मज्जातंतू, हृदय, मेंदू, विकार, त्वचा, चर्म, कँसर, लिव्हर इत्यादी अतिशय महागड्या शस्त्रक्रिया उपचारासाठी खर्च येत नाही. शहरातील काही नामवंत खाजगी रुग्णालयामध्ये देखील महात्मा फुले जीवनदायी,प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना मार्फत उपचार होतात. मनपाच्या सर्व सेवा याची माहिती चळवळीतील कार्यकर्त्यानी संकलित करावी. आणि गरजूना ती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य दूत व्हा. विविध रोग्यचिकित्सा आरोग्य शिबीर कोवीड नियमांचे पालन करून आयोजित करा. मनपा पिंपरी चिंचवडच्या आरोग्य विभागाने कोरोना महामारी काळात सुरू केलेले अभियान सर्वसामान्य जनतेला अतिशय आशा देणारे ठरले आहे.

प्रशासकीय सहकार्यातून आरोग्य समृद्धीचा सेतू उभारण्यासाठी कार्यकर्त्यानी तळमळीने काम करावे असे डॉ.किशोर खिल्लारे यांनी सांगितले. गणेश दराडे, अपर्णा दराडे, सलीम  सय्यद, सतीश नायर, शेहनाज शेख, दिलीप पेटकर, ख्वाजा जमखाने, सुषमा इंगोले, नूरजहान जमखाने, वीरभद्र स्वामी हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अमिन शेख, स्वप्निल जेवळे, जय डोळस, शिवराज अवलोळ, सोनाली शिंदे, अंजली पुजारे, मनीषा सपकाळे, कविता मंदोधरे, दिलीप पेटकर, मंगल डोळस, आशा बर्डे, संगीता देवळे, आकाश साखरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

 

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय