Thursday, February 13, 2025

पिंपरी चिंचवड : एसएफआय व डिवायएफआय आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

विजेत्यांना पारितोषिक देताना एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ

पिंपरी चिंचवड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस एफ आय) पिंपरी चिंचवड आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डी वाय एफ आय)यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली घरकुल येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्रमुख वक्त्या ऍड.मनीषा महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मार्गर्शन करताना सांगितले की, शिक्षणामध्ये मुलगा मुलगी असा लिंगभेद केला जातो. आपला वंश चालविण्यासाठी मुलगा हवा असा आग्रह धरला जातो, त्यामुळे कुटुंबातील मुलींना शिक्षणाची समान संधी आजही दिली जात नाही. शिक्षणामुळे अज्ञान दूर होते.आपल्या समोरच्या समस्या सोडवण्यासाठी  शिक्षण हेच साधन आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकतो, शिकून आपली प्रगती करू शकतो. 

ॲड. मनिषा महाजन उपस्थित विद्यार्थ्यांना संबंधित करताना..

लिंगभेद करून मुलींना शिक्षण नाकारू नये – ॲड.मनीषा महाजन 

त्या पुढे म्हणाल्या की, पारंपरिक अंधश्रद्धांचा पगडा अजूनही जनतेमध्ये आहे. टोमॅटोचा रस प्यायल्यामुळे आजार बरा करणाऱ्या भोंदू बाबाकडे जाणारे लोक पुण्यात आहेत. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी विवेकाने विचार करायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सरळ सोपा अर्थ असा आहे की जे सत्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे. त्यामुळे कुठल्याही बुवा-बाबा, ताई – अम्मा मांत्रिक यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात आत्ता जो नवीन आलेला शक्ती कायदा आहे. त्याच्या अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर महिलांना निश्चितच न्याय मिळू शकतो.

वय वर्षे 15 पर्यंत च्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमध्ये एकूण ५५ मुलांनी भाग घेतला. या स्पर्धेत प्रतिक्षा गोकुळ लोखंडे, राज अशोक सोनवणे व निमिष विनोद सकपाळ यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला. तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.

विजेत्यांना पारितोषिक देताना एड. मनिषा महाजन

प्रतिक्षा लोखंडे हिचा प्रथम क्रमांक तर राज सोनवणे यांचा द्वितीय क्रमांक

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव गणेश दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव मंडळ सदस्य विलास साबळे यांची विशेष उपस्थिती होती. 

तसेच यावेळी अपर्णा दराडे, रंजीता लाटकर, अविनाश लाटकर, सचिन देसाई, आदींसह उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भार्गवी लाटकर, शिवराज अवलोळ, दिव्या चव्हाण, तन्मय गिरी, प्रशांत सुरवसे यांनी प्रयत्न केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles