संकट काळात 50 टक्के फी माफी देण्याची मागणी
पिंपरी चिंचवड : यमुनानगर निगडी येथील एस पी एम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पालक संघटनेने 50 टक्के फी माफी देण्याच्या मागणीसाठी निगडीत पालकांनी आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांनी सांगितले की, कोरोना काळात बऱ्याच पालकांच्या नोकरी मध्ये पगार कपात करण्यात आली आहे. तसेच काही पाल्यांचे पालक आजारी आहेत, मृत्यूमुखी पडले आहेत, तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे इंटरनेट मोबाईल या बरोबर वह्या पुस्तके यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शाळेने 2019 ते 2021-2022 या कोरोना लॉकडाऊन काळात 50% फी माफी द्यावी अशी मागणी पालकांनी यावेळी केली.
पालकांनी यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक उत्तम केंदळे, पालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुळीक, उपाध्यक्ष शाम मोहिते, सेक्रेटरी अमोल गाडे, गणेश दराडे, नितीन अकोटकर, दिपक डोके, अभिजित परदेशी, पवन देवळे, संतोष मुळीक, अनिल रोहम हे उपस्थित होते.
यावेळी फी वाढीविरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच संघटनेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका वर्तक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने महिला पालक वर्ग उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षीच्या फी मध्ये सर्व पालकांना सरसकट 50 टक्के सवलत द्यावी, जोपर्यंत शाळा चालू होत नाही, ऑनलाईन वर्ग होत आहेत तोपर्यंत शालेय फी 50 टक्के भरण्याची मुभा द्यावी. चालू शैक्षणिक वर्षामधील फी वाढ रद्द झाली पाहिजे, शाळा चालू झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षेत वाढ करावी, शाळा चालू झाल्यानंतर खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करावे. सर्व प्रकारचे मैदानी खेळ सुरु करावेत.
शाळेतील पाण्याचा प्रश्न सोडवावा, स्वच्छता ठेवावी. शाळा चालू झाल्यानंतर कमीत कमी 2 पालक सभा वर्षभरात घ्यावात, अशी मागणी पालक असोसिएशनने केली. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.