Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधी रँलीचे आयोजन

पिंपरी चिंचवड : महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधी रँलीचे आयोजन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपरी चिंचवड : महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधी रँलीचे आयोजन अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.

घरकुल, चिखली परिसरात अवैध दारूधंदे, आजूबाजूच्या कट्ट्यावर दारू टाळाखोरी करणारी मुले, पुरुष यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने ये – जा करणाऱ्या मुली, महिलांना याचा नाहक त्रास होत असल्याचे महिला संघटनेने म्हटले आहे.

तसेच यासंदर्भातील तक्रारी वाढत असल्याचे महिला संघटनेच्या घरकुल शाखा अध्यक्षा इंगोले म्हणाल्या. त्यामुळेच ही रँली काढण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अपर्णा दराडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रँलीत सुलोचना अंललगी, सुषमा इंगोले, नंदा शिंदे, रंजीता लाटकर, नुरजहाँ जमखाने, निर्मला येवले, सुनीता काळे, आलका पेठे, सुप्रिया टिकले, सुवर्णा उंडे, अरुणा बडीगेर, सारिका शेळके, भागिरथी आबुज, हमीदा कोरगु, सुरेखा मराठे, रुपाली फडतरे, अर्चना इंगोले, संगिता देशमाने, मंगल कानडे, पार्वती साळवे आदीसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय