Sunday, September 8, 2024
Homeजिल्हाहातावर पोट असणाऱ्या लोकांवरील कारवाई पिंपरी चिंचवड महानगर पालिकेनी थांबवण्याची मागणी

हातावर पोट असणाऱ्या लोकांवरील कारवाई पिंपरी चिंचवड महानगर पालिकेनी थांबवण्याची मागणी

पिंपरी चिंचवड : कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, व्यापक प्रमाणात बेरोजगारी पसरली आहे, आपल्याला कुटूंबाची उपजीविका करण्यासाठी भाजी, फळे किंवा छोटा मोठा व्यवसाय करीत आहे.

एकीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांनी आत्मनिर्भर बनावे म्हणून भाषणे देतात आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यांचीच सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गरिबांवर दिवसातून दोनदा अतिक्रमण हटावची कारवाई पालिका प्रशासन करीत असल्याचे पिंपरी चिंचवड हॉकर्स युनियनने म्हटले आहे, या कारवाईचा निषेध देखील हॉकर्स युनियनने केला आहे.

या वेळी प्रशासनाला फूटपाथवर छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वक्षेण करा, व त्यांना लायसन द्या, सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कारवाई थांबवा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदन देते वेळी गणेश दराडे, अपर्णा दराडे, सचिन देसाई इंगोले, मंगल सूर्यवंशी इ. उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय