Friday, March 29, 2024
HomeNewsपिंपरी चिंचवड महानगरपालिका व सामाजिक संस्थांच्या वतीने स्वछता प्लाॅगेथॅन अभियान.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सामाजिक संस्थांच्या वतीने स्वछता प्लाॅगेथॅन अभियान.

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान व शेजारील  मोकळ्या जागेत आठवडी बाजार भरतो,अशा मोकळ्या जागेचा परीसरामधे स्वच्छता आभियान राबविण्यात आले.यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एक कदम स्वच्छता की और स्वच्छतेकडून समृद्धीकडे असे सांगत स्पीकरद्धारे आपआपला परीसर स्वच्छ करून पालिकेस सहकार्य करण्याचे त्यांनी आव्हान केले.नागरिकांनी मोकळ्या जागेत कचरा न टाकता घंटागाडीतच टाकण्याचे आव्हान करीत होते. ओला कचरा,सुका कचरा,व घातक कचऱ्याचे वर्गिकरण करण्याचे आव्हान करत होते
पिंपरी चिंचवड महानगरपालिका , टीम बेसिक्स,नवचैतन्य हास्य क्लब,दिलासा संस्था,मानवी हक्क संरक्षण संस्था,सदिच्छा महिला गट अशा अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवून परीसर स्वच्छ केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी तुमचे सहकार्य व तुमची मदत खूप लाख मोलाची आहे असे सांगून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर करूया ही माहिती सांगून जनजागृती करण्यात आली.आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपले योगदान द्यावे तसेच स्वच्छ्ता मोहीमेत जास्तीत जास्त युवकांनी तसेच सर्व नागरिकांनी यात आपला सहभाग जर घेतला तर आपण आपला परिसर आणि शहर स्वच्छ आणि सुंदर ठेऊ आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये आपले शहर देशात नंबर एक वर घेऊन जाण्यसाठी सर्वानी सहभाग घेण्याचे आव्हान जोगदंड यांनी यावेळी केले.टीम बेसिक्स वॉर्ड इंचार्ज श्रीराम डुकरे यांनी उपस्थित नागरिकांना  स्वच्छतेची शपथ दिली.

एक कदम स्वच्छता की और स्वच्छतेतून समृद्धीकडे

यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, गजानन धाराशिकर,मुरलीधर दळवी, पि.एस. आग्रवाल, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,अरविंद मांगले, सुभाष चव्हाण, सफाई कर्मचारी,   बेसिक्स संस्थाचे वाॅर्ड इंचार्ज श्री. श्रीराम डुकरे,राखी वाजाणी सह अनेक नागरिक स्वयंम स्फुर्तीने सहभागी झाले होते.
,ड क्षेत्रीय अधिकारी श्री. उमाकांत गायकवाड , ए. एच.ओ. श्री. महेश आढाव , एस.आय.श्री. बी.आर.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पृथ्वी/ वसुंधरा सप्ताह दिनानिमित्त स्वच्छता प्लाॅगेथॅन राबवण्यात आले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय