---Advertisement---
---Advertisement---
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेतर्फे सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी ‘कला गौरव पुरस्कार – २०२१’ ने सन्मानित करण्यात आले.
मराठी राजभाषा दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज मालिकेच्या माध्यमांतून महाराणी येसूबाई साहेब पात्रातून इतिहास संपुर्ण महाराष्ट्रात व घराघरात पोहचवून खऱ्या अर्थाने मोलाचे योगदान दिल्याबद्दल “कर्तव्यदक्ष” महिला म्हणून कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनसे चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष दत्ता घुले, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष दिपक भालेराव, सचिव शिवनाथ दिलपाक, प्रणव आसरे, वैजेनाथ डोपरे, सुरज लोणकर, शिवशंकर पाचपोर हे उपस्थित होते.