पिंपरी चिंचवड : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभागात नगरसेविका अश्विनीताई संतोष जाधव यांच्या प्रयत्नातून झालेल्या जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व वाचनालयाचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्याप्रसंगी नगरसेविका साधनाताई मळेकर, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका शारदा सोनवणे, विशाल आहेर, हनुमंत जाधव, चिखली मोशी चऱ्होली फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे, प्रकाश जुकंटवार, दिगांबर काशिद, वासुदेव जाधव, गुलाब जाधव, स्वप्नील जाधव, धीरज जाधव, सागर आहेर, तुषार जाधव, तसेच प्रभागातील सर्व सोसायटी चेअरमन, महिला प्रतिनिधी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.