पिंपरी चिंचवड : संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गणेशभक्तांच्या सोयीसाठी सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाने केलेल्या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने ६ गाड्या गणपतीदान व संकलन करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. थेरगाव पुल घाट चिंंचवडगाव येथे घाटावर ४ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. संस्कार प्रतिष्ठानच्या २ गाड्या फिरत्या ठेवल्या होत्या.
हेही वाचा ! पिंपरी चिंचवड : घरकुलमध्ये आधारकार्ड लिंकिंग शिबीर, 165 नागरिकांचा सहभाग
सातव्या दिवशी पिंपरी येथील डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय सहभागी झाले होते. थेरगाव पुल घाटावर १५६५ भाविकांनी मुर्तींचे दान दिले. तसेच रावेत शिंदेवस्ती, गुरुद्वारा, बिजलीनगर प्रेमलोक पार्क, चिंचवडेनगर, बळवंतनगर, शिवनगरी गिरीराज तसेच काळेवाडी रायगड कॉलनी, प्रभात कॉलनी, मासुळकर कॉलनी या विविध परिसरातील ३१५ गणेशभक्तांनी संस्कार प्रतिष्ठानच्या फिरत्या गणपती संकलन गाडीमध्ये तेथील कार्यकर्त्यांनी व महिला बचत गटांनी गणेशमुर्ती जमा करुन दान दिले. गाडीसोबत निर्माल्य देखील जमा केले.
संस्कार प्रतिष्ठानने एकूण १८८० गणपतीदान घेतले. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जनाच्या सहाही दिवशी वेगवेगळ्या टिम तयार करुन प्रत्येक टिमला जबाबदारी दिली आहे. ब प्रभाग स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी तसेच आज सातव्या दिवसाची जबाबदारी संस्थेचे खजिनदार मनोहर कड, अनुशा पै, चैत्राली नामदे, टी प्रभाकरण यांनी सहभाग घेऊन उत्तमरित्या पार पाडली. शेवटी संपुर्ण घाटावर इतःस्त पडलेले निर्माल्य साफसफाई करुन जमा केले.
हेही पहा ! खेड सेझ १५ टक्के परतावा प्रश्नाबाबत एमआयडिसी सकारात्मक !
संकलन केंद्राच्या परिसरात स्वच्छता अभियान घेतले. दान घेतलेल्या मुर्तींचे विनोदेवस्तीवरील तळ्यावर गेल्यानंतर विधीवत विसर्जन केले.
यामध्ये ब प्रभाग अधिकारी सोनम देशमुख,डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सतीश वाघमारे, विरसन चिरेकर स्थापत्य, आरोग्य निरिक्षक कंचन इंदलकर यांच्या सहकार्याने शब्बीर मुजावर, मनोहर कड, रमेश भिसे, अरुण कळंबे, प्रदिप साळुंखे, जितेंद्र जाधव, सतिश उघडे, शुभम खरपुडे, अक्षय खरपुडे, रुपाली नामदे, अनुषा पै, रामदास सैंदाने, सोमनाथ पतंगे, सतीश गवळी, बाळू माने, जयवंत सुर्यवंशी, डॉ. मारुती शेलार, डॉ.राकेश मिश्रा, डॉ.योगेश झांबरे यांनी सहभाग घेतला होता. सामाजिक कार्यकर्ते खंडू चिंचवडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना चहा व नाष्ठ्याची व्यवस्था केली होती.
हे पहा ! आंबेगाव : 108 रुग्णवाहिकेसाठी तिरपाड आणि अडविरे परिसराची अधिकारी वर्गाकडून पाहणी