पिंपरी चिंचवड : मनसेचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून त्यांना मिळणारे वेतन कोविड १९ च्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिल्या बद्दल नांदगावकरांचे मनापासून आभार मानतो. तसेच महाराष्ट्रातील जेवढे आजी माजी नेते मंडळी आहेत, त्यांनी ही नांदगावकर याचा आदर्श घेतला पाहिजे, असेे मत मनसेचे पिंपरी चिंचवड शहर विधानसभा उपाध्यक्ष संतोष बोऱ्हाडे यांंनी व्यक्त केले आहे.
बोऱ्हाडे पुढे म्हणाले, महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. बरेच लोक बेरोजगार झाले आहेत, या गोष्टी कडे राज्यातील नेते मंडळींंनी लक्ष्य देणे गरजेचे आहे. तरच राज्य सरकारला आधार मिळेल.