Friday, March 29, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : पीएफ, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य निरीक्षक कार्यालयावर कामगार संघटनांची निदर्शने,...

पिंपरी चिंचवड : पीएफ, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य निरीक्षक कार्यालयावर कामगार संघटनांची निदर्शने, मालक धार्जिण्या अधिकाऱ्यांना तंबी

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, चाकण, इ औद्योगिक आस्थापनातील कामगारांची नोंदणी, सुरक्षा नियम, पीएफ नियमितीकरण केले जात नाही. नियमानुसार २० पेक्षा जास्त कामगार असलेल्या अनेक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात कामगारांची नोंदणी करण्याची जबाबदारी टाळून मालक आणि त्यांनी नेमलेले एजंट, कन्सल्टंट यांच्या मार्फत मालक, कंत्राटदार मालकांना सोयीस्कर अशी नोंदणी केली जाते.

उरवडे येथील १७ महिलांचा आगीत होळपळून मृत्यू झाल्यानंतर कामगारांची नोंदणी न झाल्याची शेकडो प्रकरणे निदर्शनास आली आहेत. पीएफ ग्राजुईटीसह विविध कायद्यांची अंमलबजावणी करणारे भविष्य निर्वाह निधी अधिकारी, कारखाना निरीक्षक, कामगार आयुक्तालयात अधिकारी, आरोग्य विमा (ESIS) लाखो रुपये घेऊन मालक वर्गाला फायदेशीर भूमिका घेत आहेत. नोंदणी नसल्यामुळे अपघात ग्रस्त, मृत कामगार नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जातात. उरवडे येथील मृत महिला कामगार किमान ५ लाखाच्या नुकसान भरपाईपासून वंचित झाले आहेत, असा आरोप सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केला.

यावेळी आकुर्डी येथील भविष्य निर्वाह कार्यालयावर तसेच, चिंचवड येथील कारखाने निरीक्षक कार्यालयावर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शेकडो महिला कामगारांनी सुद्धा या निदर्शनात सहभाग घेतला.

पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण, रांजणगाव इ सूक्ष्म, लघु, मध्यम २० पेक्षा जास्त कामगार आहेत, त्यांना बेकायदेशीरपणे कामाला लावले जाते. त्यांच्याकडून ठेकेदारामार्फत कंपन्या धोकादायक आणि इतर उत्पादने काढून घेतात. पीएफ, कारखाना निरीक्षक, राज्य कामगार विमा अधिकारी यांच्या सरप्राईज व्हिजिट (surprise visit) फडणवीस सरकारच्या काळात बंद केल्या आहेत. मोदी सरकारने केलेले नव्या कायद्यामुळे असुरक्षित कामगार बेदखल असुरक्षित ठिकाणी काम करत आहेत. अधिकारी कामगारांसाठी असंवेदनशील आहे.

– कैलास कदम (इंटक)

भविष्य निर्वाह अधिकारी गेल्या कित्येक वर्षात कंपन्यांमध्ये वास्तव जाणून घेण्यासाठी पाहणी करत नाहीत. पाहणी दौऱ्याची पूर्वसूचना मालकांना दिली जाते. लाखो रुपये अधिकाऱ्यांना देऊन प्रत्यक्ष काम करणारे कामगार नोंदवले जात नाहीत. स्थलांतरित, परप्रतिय, हतबल बेरोजगार महिला युवकांना कायद्याचे ज्ञान नाही. स्वतःचे नफे फुगवण्यासाठी मालक वर्ग भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षेचे योगदान देत नाही, त्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिली जाते, पीएफ कार्यालयामध्ये आस्थापना नोंदणी इ अनेक कामासाठी एजंट काम करत आहेत.

– किशोर ढोकळे (राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ)

पीएफ, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालक कार्यालयावर इशारा आंदोलनाद्वारे कामगार संघटना प्रतिनिधींनी इशारा दिला आहे, यावेळी अनिल रोहम  दिलीप पवार, मानव कांबळे, गणेश दराडे, अपर्णा दराडे, तुकाराम साळवी, स्वप्निल जेवळे, अमिन शेख, संतोष पवार, देविदास जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यानी आंदोलनात सहभागी घेतला. तसेच सिटू, इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय इ संघटनानी आंदोलनास पाठिंबा दिला.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय