Saturday, June 21, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी चिंचवड : चिमुकलीचा गुन्हेगार अखेर कानपुरमधून अटक, ढसाढसा रडला

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

पिंंपरी चिंचवड : पिंपरी येथे शेजारी राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिचा निर्दयतेने खून करून मृतदेह एचए मैदानाच्या कोपऱ्यात झुडुपांमध्ये फेकून दिला. ही घटना सप्टेंबर 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणातील आरोपी तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

कानपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांना पाहून ‘मला साढ मध्येच शिक्षा द्या, पिंपरी चिंचवडला नेऊ नका’ असे म्हणत आरोपी ढसाढसा रडला.

राजकुमार उर्फ प्यारेलाल चंद्रप्रकाश कुरील (वय 32, मूळ रा. वामीपुरबा, पोस्ट. बिरसिंहपूर, ता. घाटमपूर, जि. कानपूरनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजकुमार पिंपरी येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या चिमुकलीचे राजकुमार याने 24 सप्टेंबर 2018 रोजी अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयतेने खून केला. 27 सप्टेंबर रोजी सकाळी बाराच्या सुमारास पिंपरी मधील एच ए मैदानाच्या एका कोपऱ्यात झुडुपांमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे निष्पन्न झाले.

घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तापसचक्रे फिरवली. शहरातील मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी देखील निष्पन्न केला. त्यानंतर पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आली. काही पथकांनी वेषांतर करून आरोपीच्या मूळ गावी, अन्य ठिकाणी अनेक दिवस शोध घेतला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही पोलिसांची शोध मोहीम सुरूच होती.

इकडे या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांचे काही दिवसात निधन झाले. खचलेल्या आईचा देखील काही दिवसांनी मृत्यू झाला. एका घटनेने संपूर्ण घर उध्वस्त झाले.

कानपूर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार हा फरारी होता. कानपूर नगर मधील सर्व पोलीस ठाण्यात त्याचे पोस्टर लावण्यात आले होते. कानपूर पोलिसांनी आरोपी राजकुमार याला अटक केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ पिंपरी चिंचवड मधून चार जणांची टीम कानपूर नगर मधील साढ पोलीस ठाण्यात पोहोचली.

पिंपरी चिंचवड पोलिसांना पाहून आरोपी राजकुमार गयावया करून रडू लागला. ‘मला इथे साढ मध्येच शिक्षा द्या. तिकडे घेऊन जाऊ नका’ अशी विनवणी त्याने केली. काही वेळ आरोपीने बेशुद्ध पडल्याचे देखील नाटक केले. मात्र पोलिसी खाक्यापुढे त्याचे नाटक चालले नाही. वैद्यकीय तपासणी करून कानपूर नगर पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे कानपूर नगर पोलिसांनी सांगितले.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles