अजित गव्हाणे |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मास्टर स्ट्रोक
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी युवा नगरसेवक माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला आघाडी अध्यक्षपदी सुप्रसिध्द खेळाडू प्रा.कविता आल्हाट तर युवक अध्यक्षपदी इम्रान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे तिन्ही नवे पदाधिकारी हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या नव्या बदलात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची छाप दिसून येत आहे. गव्हाणे हे त्यांचे भाचे आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विधानसभा मतदार संघात आता मोठे राजकीय आव्हान राष्ट्रवादीने निर्माण केले आहे.
बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेजमधील मुले-मुली प्रथम
कविता आल्हाट |
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!
अजित गव्हाणे पदवीधर आहेत. गव्हाणे हे गेल्या चार टर्म पासून भोसरी सॅंडविक काॅलनी प्रभागाचे नेतृत्व करत आहेत. आता पाचव्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते पदासाठीही ते इच्छुक होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. आता महापालिका आगामी निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.
प्रा.कविता आल्हाट या कबड्डी खेळाडू असून त्यांनी राज्यपातळीवर विविध क्रीडास्पर्धामध्ये लक्षवेधक कामगिरी केलेली आहे. त्यांचे शिक्षण एमए – एमपीएड झालेले आहे. भोसरीतील त्यांचे लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन कबड्डी स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे.
विशेष लेख : भारत स्वस्त मजुरांची अस्वस्थ बाजारपेठ
शहराध्यक्षासोबत तिन्ही विधानसभेसाठी स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून भोसरी विधानसभेसाठी राहुल भोसले, पिंपरी विधानसभेसाठी जगदीश शेट्टी व चिंचवड विधानसभेसाठी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे.