Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी तर्फे वृक्षारोपण !

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : पर्यावरण दिनानिमित्ताने देहूरोड मामुर्डी या ठिकाणी आम आदमी पार्टी तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कडून सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणे आणि पूर्ण महिना वृक्षलागवड करण्याचा निर्धार ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. 

जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यावरण दिनानिमित्ताने स्थानिक प्रजातीचे जांभूळ, आंबा, सोनचाफा, आवळा, चिंच, बांबू यांचे वृक्षारोपण करून करण्यात आले.

यावेळी शहर समिती सभासद सुजय शेठ, पिंपरी विधानसभा अध्यक्ष नंदू नारंग, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष यशवंत कांबळे, महिला कार्यकर्त्या श्रीमती तेजस्विनी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर सोनवणे, शहर सचिव राघवेंद्र राव हे उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles