Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : घरकुल मध्ये आधारकार्ड आपल्या दारी मोहीम

पिंपरी चिंचवड : घरकुल मध्ये आधारकार्ड आपल्या दारी मोहीम

पिंपरी चिंचवड : चिखली घरकुल मधे जवळपास २५ हजार लोकसंख्या आहे .पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून नागरिक रहायला आले आहेत. बहुसंख्य लोकांना आधार कार्ड पत्ता बदल करण्यासाठी  खुपच लांब जावे लागते होते यामुळे अशोक मगर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना पञ देऊन सहा महिने पाठपुरावा केला व सदर आधार कार्ड मोहीम मंजूर करून घेतली.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आधार कार्ड अद्यवत मोहीम

जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या विद्यमाने आणि अशोक मगर यांच्या सहकार्याने घरकुल मध्ये  ९ डिसेंबर पासून पुढील दोन महिने आधारकार्ड मोहीम राबवण्यात आली आहे.

आतापर्यंत जवळपास ५०० च्या वरती लोकांनी याचा लाभ घेतला आहे. प्रभाग ११ मधील लोकांनी या मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अशोक मगर यांनी केले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय