Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : नारायण हट सहकारी गृहरचना सोसायटीची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण...

पिंपरी चिंचवड : नारायण हट सहकारी गृहरचना सोसायटीची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

spot_imgspot_imgspot_imgspot_img

भोसरी नारायण हट सोसायटीची ५४वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. कोवीड नियमांचे पालन करत ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने सभा घेण्यात आली. नारायण हट सहकारी गृहरचना सोसायटी ही भोसरी, ता.हवेली जि.पुणे, येथील आदर्श, नावाजलेली, मोठी संस्था आहे.

सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. संस्थेशी संबंधित दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. व त्यानंतर सभेला सुरुवात झाली. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विचार विनिमयातून पार पडली. प्रत्येकाला आपली मुक्तपणे मते मांडण्याची संधी या सभेत प्राप्त झाली.

हेही वाचा ! कॉग्रेसने उभा केलेला देश भाजपाने विकायला काढला आहे – कामगार नेते अजित अभ्यंकर

सभेमध्ये एकूण विषय पत्रिकेनुसार नुसार १२ विषयांवर चर्चा घडून आली. व निर्णय घेण्यात आले, विविध ठरावांना मान्यता घेण्यात आली, व ऐन वेळेच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी, संस्थेचे अध्यक्ष, डॉ.सुरेश पवार हे होते. संस्थेचे सचिव, मा. श्री. सतीश भालेकर यांनी प्रास्तविक व मागीलवर्षाची इतिवृतांत वाचन केले.

■ संस्थेचे महत्त्वपूर्ण निर्णय खालीलप्रमाणे :   

१) संस्थेच्या जागेमध्ये असणाऱ्या शाळा इमारत व ग्राउंड संदर्भात चर्चा होऊन संस्थेच्या वतीने समिती स्थापन करून रजिस्ट्रेशन करून  संस्थेचीच शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

२) संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊन सहकार कायद्यानुसार निबंधक कार्यालयातील पॅनलच्या मार्फत पंचवार्षिक निवडणुकीबाबत  पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात ठरविण्यात आले.

हेही वाचा ! पुणे : ट्रायबल फोरम ची विधानसभा उपाध्यक्षांकडे महत्वपूर्ण मागणी

३) २०२२-२३ या वर्षातील सभासद वार्षिकवर्गणी संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

४) लेखापरीक्षक नेमणूकी बाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

५) नवीन हस्तांतरित रो हाऊस सभासदांना मान्यता देण्यात आली.

६) अंदाज पत्रक, नफा तोटा ताळेबंद पत्रकास मंजुरी घेण्यात आली.

७) इतर विषयांमध्ये शाळेच्या रस्त्या संदर्भात, गेट संदर्भात, पार्किंग संदर्भात, मंदिर बांधकाम व इतर सुविधा बाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा ! पुणे : जुन्नर येथे किसान सभेचे हल्लाबोल आंदोलन !

सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार, सतीश भालेकर, कोषाध्यक्ष संदीप बेंदूरे, सचिन तांबे, अनिल ताळे, संस्थेचे व्यवस्थापक अरुण ठोकळे याशिवाय ऑनलाईन काही पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर सावंत, मनोज पवार, डॉ. मंजुषा कदम, नीलम खेडकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, अंकुशराव गोरडे, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. रोहिदास आल्हाट, रोहिदास गैंद, संतोष बोरकर, डॉ.वसंतराव गावडे, नितीन राणे, व इतर सभासद आदींनी सभेमध्ये आपली मते मांडली. व चर्चेमध्ये भाग घेतला. आभार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पवार यांनी मानले व वंदेमातरम् ने सभेची सांगता झाली.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय