Sunday, March 16, 2025

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 नेत्यांना घरचा रस्ता

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. परंतु आज राष्ट्रवादीच्या तब्बल २१ पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी बडतर्फ केले आहे.

एनसीपी च्या अधिकृत ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी पुढील यादीनुसार विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघटनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.”

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी, फजल शेख यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

Related Articles

- Advertisement -

Latest Articles