आकुर्डी (पिंपरी) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आकुर्डीगाव मनपा दवाखाना येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण केले.
यावेळी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, वीरभद्र स्वामी, अमिन शेख, विनोद चव्हाण, शिवराम ठोंबरे, नागेश दोडमनी, किसन शेवते, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अविनाश लाटकर, जनवादी महिला संघटनेचे अपर्णा दराडे, सुषमा इंगोले, यल्लमा कोलगी, रंजिता लाटकर, शेहनाज शेख, शैलजा कडुलकर, मंगल डोळस, मनीषा सपकाळे, कविता मंधोदरे, पूजा दोडमनी हे उपस्थित होते.