युरोप मध्ये मंदीची लाट
नेदरलँड: अॅमस्टरडॅम-130 वर्षाची सुप्रसिद्ध डच हेल्थ टेक्नॉलॉजी ग्रुप कंपनी फिलिप्सने 2025 पर्यंत 6000 कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्यातील निम्मे कर्मचारी 2023 मध्ये कामावरून काढले जाणार आहेत.कंपनीने फॉलटी रेस्पिरेटरी डिव्हाईस(व्हेंटिलेटर) मार्केट मधून परत मागवाल्यांतर कंपनीची मार्केट व्हॅल्यू 70 टक्के कमी झाली.
कंपनीला 2022 च्या चौथ्या तिमाहीत 105 दशलक्ष युरो ($114 दशलक्ष) चा निव्वळ तोटा झाला आहे आणि मागील वर्षासाठी 1.6 अब्ज युरोचा निव्वळ तोटा मुख्यत्वे रिकॉलमुळे झाला होता.
मोठ्या प्रमाणात उत्पादने माघारी घेतल्यानंतर आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी आम्ही अतिशय दुःखी मनाने कामगार कपातीचा निर्णय घेत आहोत.असे फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
---Advertisement---