पुणे, दि. ११: माजी सैनिक आणि वीर नारींच्या वारसांसाठी पी.जी.डी.एम (२ वर्षे) आणि बी.बी.ए. (३ वर्षे) कोर्ससाठी फ्यूएल बी स्कूल, पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती (Scholarship) देण्यात येत असून https://fuelfornation.com/hunar.php या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
पी.जी.डी.एम.अभ्यासक्रमासाठी स्नातक पदवी, अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांने सामान्य प्रवेश परीक्षा (कॅट), सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (सीएमएटी), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) किंवा पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (जीमॅट) दिलेली असावी. (Scholarship)
बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी हा १२ वी उत्तीर्ण असावा. तसेच राज्यातील सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिलेली असावी. अभ्यासक्रमाचा प्रारंभ जुलै किंवा ऑगस्ट २०२४ मध्ये होणार असून शिकवणी (ट्यूशन), बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भोजन आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि वीर नारींच्या वारसांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी केले आहे.


हेही वाचा :
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण