Saturday, October 5, 2024
Homeराज्यजीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटीसह परवानगी

जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटीसह परवानगी

मुंबई : सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत. १० जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत. 

■ अशा असतील ‘अटी’

● ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. तसेच जीमसुद्धा ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येणार आहे. याआधी दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 

हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा

● सौंदर्य सलूनसाठी 50 % क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली जाईल. सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही अश्याच सेवा सुरु राहतील. 

● फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. 

● केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.

● जीमसंदर्भातही असेच आदेश देण्यात आले आहेत. मास्क वापरण्याच्या अटीवरच 50 % क्षमतेसह जिम उघडे ठेवण्याची परवानगी आहे.

मोठी बातमी ! राज्यात नवे निर्बंध लागू

● केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. जिमचे सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.


संबंधित लेख

लोकप्रिय