Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

उपयोगकर्ता शुल्क विरोधात हौसिंग सोसायट्यानी दंड थोपटले.

प्रशासकीय राजवटीचा मनमानी निर्णय रद्द करा-संजीवन सांगळे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:महापालिकेने१एप्रिल २०२३ पासून घरटी मासिक ६० रु वार्षिक ७२० रु कचरा संकलन कर अर्थात उपयोग कर्ता शुल्क मिळकत करात सामाविष्ट केले आहे.ही जी आपण उपयोगकर्ता मूल्याची आकारणी व वसुली करण्याचा निर्णय मनमानी व चुकीचा आम्हा सोसायटीधारकांच्यावर अन्याय करणाराआहे.याला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कडाडून विरोध आहे.अशी टीका संजीवन सांगळे, अध्यक्ष -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन यांनी केली आहे.

आयुक्त शेखर सिंह यांना पाठवलेल्या निवेदनात मागणी केली आहे की,चालू केलेले उपयोगकर्ता शुल्क रद्द करून याची वसुली बंद करून, जुन्याच पद्धतीने कर आकारणी करावी.पिंपरी चिंचवड मनपामध्ये ज्या वेळेपासून प्रशासकीय राजवट चालू झालेली आहे.तेंव्हापासून प्रशासक तथा मनपा आयुक्त मनमानी करून कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही सामाजिक संस्थांना हौसिंग फेडरेशनच्या प्रतिनिधींना विश्वासत न घेता काहीही निर्णय घेत आहेत. यामध्ये मालमत्ता हस्तानंतरण शुल्कवाढ, तसेच आताचे उपयोगकर्ता शुल्क वसुली असे निर्णय घेतलेले आहेत. हे आम्हाला मुळीच मान्य नाहीत. आयुक्तांनी हे निर्णय त्वरित रद्द करावेत आणि आपण शहराचे मालक नव्हे तर पालक आहोत याची जाणीव ठेवावी.

पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे २०१९ पासून अंमलबजावणी करण्याचा आदेश ताबडतोब रद्द करावा.मालमत्तेवर जुन्या पद्धीने करआकारणी करून नवीन मालमत्ता करआकारणी पत्रक जाहीर करावे अन्यथा आमच्या एकाही सोसायटीमधील एकाही सदस्य हा मालमत्ता कर भरणार नाही. तसेच याबाबत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा संजीवन सांगळे यांनी प्रशासनास दिला आहे.सदर निवेदन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,आमदार महेश लांडगे यांना पाठवण्यात आले आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles