Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : एसबीपीआयएम निगडी मध्ये युवोत्सव क्रीडा महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन

सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार उद्घाटन (PCMC)

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये “युवोत्सव २०२५” या आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.२७) सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. १ मार्च) मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

---Advertisement---

युवोत्सव स्पर्धेच्या आयोजनाचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट या स्पर्धांचा समावेश आहे. युवोत्सव क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे परिसरातील पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयामधील संघ सहभागी होणार आहेत. विजयी संघांना आकर्षक बक्षिसे व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती एसबीपीएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. स्पर्धेचे आयोजनात डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा यांनी सहभाग घेतला आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ

संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles