Wednesday, February 12, 2025

PCMC : यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : प्रभाग क्र. १३, यमुनानगर, निगडी येथील कै.मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर लोटले आहे मात्र तरी देखील जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही.

कै.मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कै.मीनाताई ठाकरे जलतरण तलाव तातडीने खुला करावा अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सचिन चिखले यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, कै.मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर लोटले आहे, मात्र हा तलाव अद्याप नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. सध्या उन्हाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जलतरण तलाव चालू करण्याची मागणी करण्यात येत आहे. तरी देखील प्रशासनाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. तरी

प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या हितासाठी लवकरात लवकर कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव वापरासाठी खुला करण्यात यावा अशी मागणी सचिन चिखले यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles