पिंपरी चिंचवड – व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी निर्भीडता, सत्य, निरंकुश ध्येयवाद असावा लागतो ते बाबासाहेबांकडे होता. स्वातंत्र्य,समता, लोकशाही आणि न्याय या मानवी मूल्यावर आधारित समाज अभिप्रेत होता. बाबासाहेबांनी समाज परिवर्तनाची भूमिका सर्वसमावेशकतेने मांडली देशातील तमाम शोषित, पीडित, कामगार वर्गासाठी सामाजिक न्यायाच्या कृतिशील ध्यास घेत कष्टकरी कामगारांना न्यायिक भूमिका घेतली असे मत काम करण्याचे काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, निमंत्रक महादेव गायकवाड, उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य सलीम डांगे, किरण साडेकर,
कोमल काळे, मनीषा आडवे, विनया चव्हाण, मुक्त पोळ, महानंदा घळगे, जयश्री दातकर, सीमा भिसे, नर्मदा लानजुळकर, महादेव घळगे आदी उपस्थित होते. (PCMC)
बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनासाठी संसद विधेयक सुधारणा व भारतीय राजकारणात शुद्धता यावी हे पाहत होते . एक सुसंस्कृत बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले सर्वांना समान संधी मिळाव्यात, कामगारांचे वेतन असो इतर सुविधा असो या मिळणे गरजेचे असून ते सुरक्षित असावे यासाठीही बाबासाहेबांनी प्रयत्न केले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कामगारांकडून अभिवादन
---Advertisement---
- Advertisement -