Tuesday, May 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : शाहू महाराजांना कामगारांची आपुलकी – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांचा उद्धार करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला, १९१८ मध्ये मुंबईच्या परळ भागात कामगार मेळाव्याचे अध्यक्षपद भूषवीले आणि त्यावेळी मुंबई शहर हे व्यापार व उद्योग धंदा बाबतीत प्रसिद्ध आहे धनिकांचे भांडवल कारखानदाराचे व्यवस्थापन चातुर्य यावरच उद्योग धंदा अवलंबून आहे अशी समजूत होती. (PCMC)

---Advertisement---

पाश्चात्य देशात भांडवलवाले व मजूर असे दोन वर्ग आहेत तिकडेही भांडवलदार लोकांची मजुरावर बेसुमार सत्ता चाले पण आता मजूरदार लोकांनी आपले संघ बनवले आहेत. गवताचे एका काडीची ताकद जास्त नसते, पण आता अशा अनेक काड्यांचा वेठ वळला तर त्याने हत्तीलाही बांधता येईल असे म्हणून कामगारांच्या संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले. कष्टकरी, कामगारांबाबत आपुलकीअसणारे राजर्षी शाहू महाराज होते असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कष्टकरी कामगारांनी थरमॅक्स चौक चिंचवड येथे राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी अनिल बारवकर, सलीम डांगे, चंद्रकांत कुंभार , सुनील भोसले वनिता शेलार, जयश्री भोसले, रेखा शिंदे, सत्य दुर्गाळे, आरोही मोरे, उषा माळी , वंदना कोरे, सुनील मोरे, विनिता जरे, आम्रपाली जाधव, आदीसह कामगार उपस्थित होते. (PCMC)

राजश्री शाहू महाराज यांनी १९१८ मध्ये ” पीपल्स युनियन ” या कामगार लोकांनी स्थापन केलेल्या संघटनेचे उद्घाटन प्रसंगी म्हणाले की मी कोल्हापूरच्या राजपदावर असताना शिपाई, शेतकरी किंवा मजूर म्हणून घेण्यात मला अभिमान वाटतो. इंग्लंड प्रमाणे मजुरांचे संघ आपल्याकडे झाले पाहिजेत सर्वांचे आपले हक्क काय आहेत ते कळले पाहिजेत. (PCMC)

भांडवलवाल्या वृत्तींचा इथे जास्त भरणा आहे त्यांना दाबात ठेवल्याशिवाय मजुरांची उन्नती होणे कठीण आहे. कामगार, मजूर या शब्दात कमीपणा नाही असे कष्टकरी कामगारांचे महत्त्व अधोरेखित करणारे राजे खूप कमी प्रमाणात भेटतात. म्हणूनच प्रा. एन. डी. पाटील हे शाहू बाबत म्हणतात की कामगारांनी आपल्या युनियनस काढल्या पाहिजेत असे सांगणारा असा एकही संस्थांनीक शोधूनही सापडणार नाही. युरोप आणि रशिया सारख्या देशात कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली राज्य स्थापन झाल्याचा दाखला देणार हे लोकनेते कामगार वर्गाच्या ताकतीची कर्तव्याची जाणीव धीर गंभीरपणे करून देत होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles