Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : शिवछत्रपतींचे विचार रुजविण्यासाठी काम करा – बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – कामशेत येथील रिक्षा चालकांनी एकत्रित येऊन हिंदवी स्‍वराज्‍य रिक्षा स्‍टँडची स्‍थापना केली याचा आनंद आहे. मावळचा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पराक्रमाने आणि पदस्‍पर्शाने पावन झालेला आहे. त्‍यांचा आदर्श घेऊन रिक्षा चालकांनी स्‍टँड सुरू केले आहे. हे कौतुकास्‍पद आहे. रिक्षा चालकांनी शिवछत्रपतींचे विचार रुजविण्यासाठी काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. (PCMC)

---Advertisement---

कामशेत येथील मुख्य चौकामध्ये हिंदवी स्वराज्य रिक्षा स्टॅंडचे उद्घाटन बाबा बाबा कांबळे यांच्‍या हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ. अमर चौरे, ग्रामपंचायत समिती सदस्य नीलेश दाभाडे. मावळ तालुक्याचे कार्याध्यक्ष अनिल गायकवाड. ज्येष्ठ सल्लागार संजय कुलकर्णी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत कामशेत शहराध्यक्ष लखन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुदाम कांबळे, नितीन निकाळजे स्वप्निल भालेराव, आदी यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्‍हणाले की, महाशिवरात्री सारख्या पवित्र सणादिवशी हिंदवी स्वराज्य रिक्षा स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. त्‍या बद्दल रिक्षा चालकांचे अभिनंदन करतो. रिक्षा चालकांना सामाजिक भान नाही. ते चुकीचे वागतात अशा प्रकारच्या अनेक गोष्टी कानावर येतात. या परिस्थितीमध्ये बदल केला पाहिजे. सामाजिक उपक्रम राबवत असताना रिक्षा चालक जेव्हा हिंदवी स्वराज्य सारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रिक्षा स्टँड सुरू करतात तेव्‍हा त्‍याचा अभिमान वाटतो. (PCMC)

---Advertisement---

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी हिंदवी स्वराज्य रक्षक स्थानचे अध्यक्ष राजू नवले उपाध्यक्ष सतीश दिले, शशिकांत गाडेकर संतोष गायकवाड आकाश ठाकर सुरेश कदम दत्तात्रय केदारी कमलेश ननावरे विजय भाऊ भालेराव रविकांत जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजनासाठी परिश्रम घेतले केले.

हे ही वाचा :

इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ

संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles