दिल्ली जंतर मंतर येथे देशभरातील संघटनेचे आंदोलन (PCMC)
राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील संघटनांचा सहभाग
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – देशभरातील लाखो ऑटो, टॅक्सी, बस ट्रक चालकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक वर्ष लढा दिला जात आहे. राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे. देशभरातील चालकांसाठी कल्याणकारी बोर्ड निर्माण करून त्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा म्हातारपणी पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांवरती बंदी आणली पाहिजे टू व्हीलर टॅक्सीला देशभरामध्ये बंद केली पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण ठरवताना पूर्वीचे वाहन वरती कोणतीही बाधा येणार नाही यासाठी सर्व संघटनांना विश्वासात घेण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी नुकतेच दिल्ली येथील जंतर मंतर वरती देशपापी आंदोलन करण्यात आले या आंदोलनातील मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. (PCMC)
दिल्ली जंतर मंतर येथे देश वापी आंदोलन आयोजित करण्यात आले या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.
कष्टकरी, श्रमिक नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 21 मार्च 2025 रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले, 23 तारखेला राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते यासाठी देशभरातील सर्व 28 राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होते.
यात मिर मोहम्मद शफी (कश्मीर), अज्जू प्रसाद, मंडोली (ओडिसा), सुरेंद्र प्रसाद (पंजाब), मनोज कुमार साहू, वासू एलडी (आंध्र प्रदेश), के.डी.गिल (राजस्थान), रवी रेड्डी (कर्नाटका), आनंद तांबे, राकेश शिंदे (महाराष्ट्र), शीतल कुमार (तामिळनाडू), प्रीतम सिंग (छत्तीसगड), गुलजार सिंग (उत्तराखंड), नरेंद्र ठाकूर (हिमाचल प्रदेश), निजामुद्दीन भाई, विनोद तिवारी (आसाम), भूपेंद्र यादव (बिहार), धर्मेंद्र यादव (दिल्ली एनसीआर), डॉ राजीव मिश्रा (उत्तर प्रदेश),
बाबा कांबळे म्हणाले केंद्र सरकार देशभरातील 25 करोड चालकांकडे सहानुभूतीने बघत नाही. त्यामुळे वारंवार निवेदने, आंदोलन करूनही मागण्या सोडविण्याबाबत सरकार उदासीन आहे. देशातील 25 कोटी चालकांसाठी राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे. तसेच चालकांसाठी कल्याणकारी योजना स्थापन झाले पाहिजे. त्यामधून चालकांचे कल्याण होणार आहे. म्हातारपणी पेन्शन मिळाल्यास त्यांना आधार होणार आहे. यासह सामाजिक सुरक्षा योजना मिळावे, यासाठी वेलफेअर बोर्ड म्हणजे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. केंद्रीय पातळीवर हे कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावा. अन्यथा न थकता आंदोलन सुरूच राहील, असे बाबा कांबळे म्हणाले.