Tuesday, November 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सावली निवारा केंद्रास वुई टूगेदर फाउंडेशन मदतीचा हात देऊन मानवतावादी...

PCMC : सावली निवारा केंद्रास वुई टूगेदर फाउंडेशन मदतीचा हात देऊन मानवतावादी कार्य करत आहे – कॉम्रेड श्री. सी. श्रीकुमार, महासचिव (AIDEF)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – मागील चार दशकात वृध्दाश्रम,अनाथ बालकांचे आश्रम, निराधार सेवा केंद्रांची संख्या देशभरात झपाट्याने वाढली आहे. आपल्या देशात एकेकाळी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरातील वयोवृध्द आजी-आजोबा यांना सांभाळत कुटुंब व्यवस्था आणि एकमेकांना सांभाळायची एक आदर्श संस्कृती होती. (PCMC)

आजच्या घडीला विविध शहरांत वाढत असलेले स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवले जाणारे निराधार बेघरांचे वृध्दाश्रम (old age homes) किंवा अनाथ बालकांचे आश्रम ही एक विचित्र आणि मनाला दुःख देणारी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. (PCMC)

बँक बॅलन्स आहे, पैसा आहे तरी सुद्धा मुले परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होत आहेत आणि आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी इथे कोणी आधार नाही, त्यामुळे काही जेष्ठ नागरिक वृद्धाश्रमात राहत आहेत. आजची शिक्षण पद्धती करिअरवादी आहे.

चाळीस वर्षांपूर्वी गरिबी होती, कमाई कमी होती, मात्र एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा, वृध्द आई-वडील यांना कोणी निराधार करत नव्हते. गरिबीतही त्यांची काळजी मुले-बाळे घेत होती. अलीकडच्या काळात महागाई, बेरोजगारी, शहरांत असणारी जागेची चणचण, सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरील घरांच्या किमती व लघु कुटुंब पद्धतींमुळे रस्त्यावर भटकणाऱ्या बेघर, निराधार लोकांची संख्या वाढत आहे. हा आपल्या शिक्षण पद्धतीमधील दोष आहे कां? किंवा याचे इतर काही सामाजिक पैलू आहेत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

ज्येष्ठांना समाजात अशा प्रकारची मिळणारी वागणूक बघुन मन अस्वस्थ होते. खरंच आपण इतके पुढारलेले आहोत कां? की आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. नात्यांमध्ये कोरडेपणा वाढत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेले सावली निवारा केंद्र डोक्यावर छत नसलेल्या अनामिक आणि विमनस्क लोकांचे आश्रयस्थान आहे, इथे रिअल लाईफ रिअल पीपल आणि वुई टुगेदर फाउंडेशन या दोन सेवाभावी संस्था अमूल्य कार्य करत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या मानवतावादी निवारा केंद्रास वुई टुगेदर फाउंडेशनचा मदतीचा हात मिळत आहे, हे मानवतावादी कार्य आहे.असे मत ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनचे (AIDEF) महासचिव कॉम्रेड श्री. सी. श्रीकुमार यांनी व्यक्त केले. (PCMC)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि रिअल लाईफ रिअल पीपल या सेवाभावी संस्थेमार्फत निराधारांचे उपचार व संगोपन करणाऱ्या पिंपरी कॅम्प येथील सावली निवारा केंद्रास कॉम्रेड श्री. सी. श्रीकुमार यांनी (दि. ६ रोजी) भेट दिली.


वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद तसेच रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे एम ए हुसेन आणि त्यांच्या टीमने यावेळी केंद्रातील व्यवस्थापन कसे चालते याची माहिती तसेच येथील रस्त्यावर, फुटपाथवर विमनस्क अवस्थेत जगणाऱ्या लोकांना इथे आणून त्यांचे संगोपन आणि पुनर्वसन कसे केले जाते याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

निवारा केंद्राला मदतीचा हात आणि वुई टुगेदर फाउंडेशन

सावली निवारा केंद्रात सध्या ८७ बेघर आश्रयास आहेत. या ठिकाणी त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आरोग्याच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे हे केंद्र रस्त्यावर तसेच ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा विमनस्क अवस्थेत शहरात फिरणाऱ्या बेघरांसाठी हक्काचं घर बनलं आहे. बेवारस रस्त्यावर भटकणाऱ्या लोकांसाठी सावली निवारा केंद्र मोठा आधार आहे, या ठिकाणी अन्नदान, कपडे, इतर गरजेनुसार वेळोवेळी वुई टुगेदर फाउंडेशन मदतीचा हात देत असते, असे एम ए हुसेन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले. (PCMC)

वुई टुगेदर फाउंडेशनचे सदस्य श्रीरंग दाते येथील वृद्धांसाठी शर्ट आणि पायजमे स्वखर्चाने आणि स्वतः घरी शिवून देतात.

त्यांनी दिलेल्या कपड्यांचे वितरण यावेळी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते सावली निवारा केंद्रात करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री.सी.श्रीकुमार, ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनचे (AIDEF) महासचिव कॉम्रेड श्री. सी. श्रीकुमार, सल्लागार मधुकर बच्चे, सल्लागार सीता केंद्रे, AIDEF चे खजिनदार मोहन होळ, जी जे मॅथ्यू, परमानंद सोनी सह सल्लागार सीता केंद्रे, उत्तमराव दंडीमे, दारासिंग मन्हास, सोनाली मन्हास आदी मान्यवरांच्या हस्ते येथील आश्रितांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच मोहन होळ यांनी दहा हजार रुपये देणगी सावली निवारा केंद्रास दिली. (PCMC)

यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे सह सदस्य गुरुराज फडणीस, दिलीप पेटकर, रविंद्र काळे, अर्जुन पाटोळे, गंगाराम चौधरी, विजय केसकर, श्रीकांत पाटणे, शामराव खोत, एम के शेख, जावेद शेख, झाकीर सय्यद, श्रीपाद जलवादी, गंगाराम चौधरी,श्रीरंग दाते, सदाशिव गुरव, खुशालराव दुसाने,श्रीकांत पाटणे, परमानंद सोने, शंकरराव कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, अनिल मोरे, रवींद्र काळे, बाळासाहेब जगताप, बापूसाहेब कदम, रंगाराज ककुला, विलास गटणे, अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे संस्थापक एम ए हुसेन यांनी केले, सल्लागार मधुकर बच्चे यांनी सूत्रसंचालन केले. आभार गौतम थोरात यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय