Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : सामाजिक बांधिलकी समजून चिमण्यासाठी पाण्याची व धान्याची घेतली जातेय काळजी – संगिता जोगदंड.

पिंपरी चिंचवड – शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे गावाखेडयाचे रूपांतर शहरात होऊ लागले आहे, शेत जमीन नामशेष होऊन सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे जंगल निर्माण होऊ लागले आहेत. पक्षांचा शहरातील अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतून पक्षाची काळजी घेण्याचे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड यांनी केले आहे. (PCMC)

शहरीकरणामुळे आणि प्रदूषणामुळे चिमण्या बरोबरच इतरही पक्षाचा ही आदिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कालांतराने पुढील पिढीसाठी हे धोकादायक आहे .लहानपणी संध्याकाळी चिऊताईचा किलबिलाट ऐकायला मिळायचा अशावेळी मला ग. दि. माडगूळकर यांचा ” या चिमण्यांनो परत या ” हे गाणे आठवते.

यामुळेच दरवर्षी मी स्वतः फेब्रुवारीपासूनच चार महिने सात वर्षांपासून चिऊताई साठी प्लास्टिकच्या भांड्यामध्ये घरासमोर व जिन्याला आणि गँलरीत पण पाण्याने भरलेले टोपले आणि आँनलाईन पक्षासाठी बर्ड फिडर*मागवले आहे त्यांच्या मध्ये फक्त चिमणी बसु शकते ईतर पक्षांना बसण्यासाठी जागाच नाही, अशी सोय त्यामध्ये केलेली आहे बर्ड फिडर मध्ये फक्त गहू ,बाजरी,ज्वारीच त्यामध्ये टाकली जाते इतर कोणते खाद्यपदार्थ टाकले जात नाही. सकाळ-संध्याकाळ चिमण्या  आवर्जून येतात.मी दररोज त्याची काळजी घेते. (PCMC)

यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, मोबाईलचे टावर आणि विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे, तसेच वायू प्रदूषण,पिकासाठी शेतीमध्ये वापरले जाणारे रसायनिक औषधे ,खते,रसायुक्त पाणी नदी पात्रता सोडणे फळझाडांमध्ये घट,यामुळेच पक्षासाठी पाणवटे राहीलेले नाहीत .उन्हाळ्यामध्ये पक्षांना अन्न व पाण्याची नितांत गरज भासत आहे, म्हणून प्रत्येक नागरीकांनी आपापल्या परीने चार महिने तरी पक्षासाठी धान्य, व पाण्याची सोय करावी ,काही चिमण्या पहाटेपासून गॅलरी येतात त्यांचा आवाज ऐकून खूप आनंद वाटतो एक प्रकारचे घड्याळाप्रमाणे सकाळी सकाळी आवाज देतात यामुळे आम्हाला त्याची सवय झाली आहे.आमचे कौटुंबिक नाते असल्यासारखे वाटते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles