Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : राष्ट्राच्या एकात्मतेसाठी मतदान, शंभर टक्के मतदान

पुणे मेट्रो मध्ये मतदार जागृती

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : प्रबोधन मंच या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्यासाठी पिंपरी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रोमध्ये मतदार जागृती करण्यात आली.

मंचाचे कार्यकर्ते भास्कर रिकामे यांनी प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. स्थानिक निवडणुका व लोकसभेची निवडणूक यातील फरक समजून सांगितला.

लोकसभेचे मतदान करताना राष्ट्रीय मुद्दे जसे की, सीमेवरील सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय निती, स्थिरता आदीं विषयी अभ्यास करुन योग्य उमेदवारांना मतदान करा असे आवाहन केले. pcmc

यावेळी प्रवाशांनी स्वतः पुढे येऊन फलक हातात घेऊन सेल्फी काढले, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करु असे आवर्जून सांगितले.

शारदा रिकामे यांच्या संकल्पनेतून ही मतदार जागृती मोहीम आयोजित करण्यात आली. उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सुजित गोरे, पोपट आमले आदिंनी मेहनत घेतली व सक्रिय सहभाग घेतला.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles