पिंपरी चिंचवड – २५ जानेवारी २०२५ रोजी १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस भारत देशामध्ये साजरा केला जात आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे अवचित साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी प्रज्ञा कांबळे, ऋषिकेश नागनाथ कारंडे, निकिता संजोग देवकर, महादेव दहिफळे, अनिकेत दत्ता बोडके, कोमल रमेश काळे, पुनम नामदेव कांबळे, वैष्णवी राहुल गायकवाड, करुणा केशव काकडे, शुभम चंद्रकांत वायाळ सुनील बाईक, गौरव दत्ता गायकवाड, प्रज्वल, वीर दुर्गा कीर्ती गव्हाणे, मयुरी पाटील, साके सुनिता, श्रुतिका भगवान खुडे, करुणा संभाजी ढवळे इत्यादी ४० हुन अधिक विद्यार्थ्यांनी २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी लोकसभा मतदारसंघ क्रमांक-३३ मावळ. या मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभा मतदार संघ क्रमांक-२०५ चिंचवड. मतदार संघातील विभाग क्रमांक-१. समता नगर व सकर्म नगर नवी सांगवी. येथील एकूण १०५२ मतदार (५३६-पुरुष व ५१६-महिला) मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदान जनजागृती व नोंदणी. असे दोन दिवसीय प्रात्यक्षिक प्रत्यक्ष सर्वे करून पूर्ण केले. (PCMC)
सदर प्रात्यक्षिकाची सुरुवात २४ जानेवारी २०२५ रोजी विद्यार्थ्यांनी Indian Election Commission च्या वेबसाईटला जाऊन Voter list district Pune Government of Maharashtra India. या पोर्टलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या स्वत:च्या नावाची नोंदणी केलेली होती. त्यांनी आपले नाव मतदान यादीमध्ये आलेले आहे. की, नाही हे पडताळून पाहिले. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विभाग क्रमांक-१. समतानगर व सकर्मनगर नवी सांगवी. येथील मतदारांची यादी शोधून काढून डाऊनलोड करून घेतली.
प्रत्येक विद्यार्थ्याने ३० मतदारांची यादीची प्रिंट घेऊन मतदार यादीतील मतदान ओळख क्रमांकावरून संबंधित मतदाराची प्राथमिक माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करण्यासाठी मतदारांची जी यादी प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवली होती. त्या मतदारांशी प्रत्यक्ष भेटी दरम्यान कशाप्रकारे संवाद करायचा, मतदारांकडून कोणती माहिती जमा करायची, नव मतदाराची नाव नोंदणी कशाप्रकारे करायची, एखाद्या मतदाराचे नाव मतदान यादीत कसे पडताळून पाहायचे, भारतीय लोकशाहीतील मतदारांच्या मताचे महत्त्व. अशी सर्व माहिती प्रत्यक्ष सर्वेच्या माध्यमातून मतदारांकडून कशा पद्धतीने जमा करता येते. व मतदारांनी आपल्याला काही प्रश्न विचारले तर त्यांना कशाप्रकारे उत्तरे द्यायची. याचे प्रशिक्षण डॉ.गोरक्षा डेरे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
२५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० मिनिटांनी नवी सांगवी येथील समता नगर व सकर्म नगर येथे जाऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सर्वेकरण्यास सुरुवात केली.त्यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.वंदना पिंपळे व डॉ. विजय बालघरे विद्यार्थ्यांना सर्वेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी ज्या नव मतदारांना भेटले त्यांच्याबरोबर संवाद साधताना माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे शासनाला, शासनाचे नव तरुणांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच देशात बेरोजगारी वाढली आहे. असे प्रश्नही नव मतदारांनी प्रात्यक्षिक करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले. त्यावर प्रात्यक्षिक करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही १७ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शासन एका मताने विसर्जित झाले होते.
PCMC
तसेच आपल्यासारख्या नवतरुणांमध्ये कौशल्य पूर्ण उच्च शिक्षणाचा अभाव, आत्मसंयम,समय सूचकता असे कोणत्याही शासकीय किंवा बिगर शासकीय व्यवस्थेला आवश्यक असणारे गुण कौशल्य असतील तर रोजगाराच्या संधी निर्माण होतात. हे नव मतदारांना पटवून दिले.
उज्वला गॅस योजना, मुलींना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आताच पार पडलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याची कबुली ही काही महिलांनी दिली. आम्ही आमच्या मतदानाचा हक्क पार पाडतच आहोत परंतु शासनाने ही शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न,वाढती बेरोजगारी,वाढती महागाई, महिलांची सुरक्षा, वाहतुकीची समस्या व मानवी आरोग्य सुविधा अशा महत्त्वाच्या प्रश्नांकडेही शासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी भावना ही महिला मतदारांनी व्यक्त केली. (PCMC)
शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळाला पाहिजे,सामान्य नागरिकांवरील विविध कर/टॅक्स कमी केला गेला पाहिजे, मानवी श्रमावर आधारित औद्योगिक वसाहतींची निर्मिती केली पाहिजे,ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मोफत दिल्या पाहिजेत. प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास व शिक्षण शासनाने दिले पाहिजे. जागृत मतदार म्हणून आम्ही भारतीयांनी शासनाकडून वरील सर्व घटकांची अपेक्षा ठेवण्यात चुकीचे काय आहे. अशी ही भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
२० पेक्षा अधिक नव मतदारांना स्वत:च्या नावाची ऑनलाईन नाव नोंदणी निवडणूक आयोगाच्या ऑपवरून करता येते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक असतात.व ती कशाप्रकारे अपलोड करायची हे प्रत्यक्ष त्यांच्याच मोबाईलमध्ये प्रात्यक्षिक करून दाखविले. आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नावाची नोंदणी झालेली आहे की नाही हेही आपल्याच मोबाईलमध्ये कसे पडताळून पहायचे हेही प्रात्यक्षिक करणार्यान विद्यार्थांनी नव मतदारांना दाखविले. (PCMC)
एका मतदार संघातील नाव अन्य मतदार संघात करण्यासाठी प्रक्रियाही स्थलांतर केलेल्या नागरीकांना विद्यार्थांनी समजून सांगीतली.मतदान जागृती आणि नोंदणी प्रात्यक्षिक सर्वेचे नियोजन डॉ.गोरक्षा डेरे व प्रा.प्राजक्ता कुंभार यांनी केले होते.विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाची छायाचित्रे प्रणित पावले यांनी काढली.
PCMC : “मतदान जनजागृती व नोंदणी प्रात्यक्षिक सर्वे”
- Advertisement -