Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पीसीसीओई येथील हवामान निरीक्षण केंद्राला अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट

PCMC : पीसीसीओई येथील हवामान निरीक्षण केंद्राला अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे सौर उर्जेवर चालणाऱ्या हवामान, वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राला मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी ब्रेंडा सोया यांनी भेट दिली. (PCMC)

यावेळी समन्वयक अनन्या घोष तसेच पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेंडा सोया यांनी हवामान निरीक्षण केंद्राचे कार्य, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदी, हवामान बदल याविषयी माहिती जाणून घेतली. नोव्हेंबर २०२३ मध्ये सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयुएनवाय) आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या द्वारे या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. (PCMC)

यूएस कॉन्सुलेट जनरल- मुंबई द्वारे ब्रॉन्क्स समुदायाला प्रदान केलेल्या अनुदानाद्वारे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प बीसीसी, सीयुएनवाय आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातील सहकार्याने विकसित करण्यात आला असून प्रकल्प सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे रसायनशास्त्र विभागप्रमुख, अर्थ आणि एन्व्हायरमेंटल सायन्स प्राध्यापक नील फिलिप्स आणि प्राध्यापक परिमिता सेन यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला आहे.

हे हवामान केंद्र विस्तृत प्रमाणात हवामान संबंधी डेटा जसे तापमान, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरण, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता गोळा करते. जमा झालेला डेटा डेव्हीस वेदर लिंक ॲपद्वारे रिअल टाईम मध्ये उपलब्ध होतो. त्याचा फायदा हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय