पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या वृंदा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स डे व अंतर महाविद्यालयीन परेड संचलन स्पर्धेचे आयोजन निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर करण्यात आले होते त्यात प्रथम क्रमांक विद्यानंद भवन द्वितीय एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव तर तृतीय क्रमाक विभागून पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर व प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांनी पटकाविले. (PCMC)
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक ,सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ भूपाली शहा, विद्यालयाच्या प्राचार्या वृंदा जोशी, प्रमुख पाहुणे आर्मी एअर डिफेन्सचे रिटायर्ड सुभेदार मेजर प्रकाश जाधव, इंडियन एअर फोर्सचे रिटायर्ड वारंट ऑफिसर मनोज भांजा, सेंट अँन्स विद्यालयाच्या प्राचार्या क्लैरा दास, मातृ विद्यालयाचे संचालक स्वामीनाथन, संस्थापक श्रीधर साईनाथ, प्राचार्या लुमा शेरियन, उपप्राचार्या लीजा सोजू व समन्वयीका गुलनाज खान यांच्या उपस्थितीत विजेत्याना भव्य चषक, प्रशस्तीपत्रके व सहभागी महाविद्यालये, शाळांना प्रशस्तीपत्रके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
PCMC
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या वृंदा जोशी यांनी केली सूत्रसंचालन शिक्षिका प्राजक्ता डिंगणकर यांनी तर आभार उपप्राचार्या लीजा सोजू यांनी मांनले .
PCMC : परेड संचालन स्पर्धेत विद्यानंद भवनने प्रथम क्रमांक पटकाविला
- Advertisement -