वुई टूगेदर फौंडेशनच्या वतीने आदिवासी आश्रम शाळेसाठी शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ भेट कार्यक्रम
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने शासकीय आदिवासी आश्रम शाळा मौजे खटकाळे, ता.जुन्नर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (स्कॉलरशिप गाईड्स, वह्या ईई) व मुलींसाठी सॅनिटरी पॅडस तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,चिखली प्राधिकरण या संस्थेने दिलेली दिवाळी फराळ वितरण कार्यक्रम काशिधाम मंगल कार्यालय,चिंचवड येथे दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.विलास कडेकर, प्रमुख पाहुणे डॉ.पार्श्वनाथ वेळापूरे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी महेश पोळ, संजय हजारे होते. यावेळी ऍड.विलास कडेकर यांनी संस्थेच्या सभासद व देणंगीदारांच्या निःस्वार्थ भावनेचे कौतुक केले. ते म्हणाले की,
भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे,शहरे समृद्ध झाली असली तरी दुर्गम डोंगरी भागातील आदिवासी मुलामुलींना शैक्षणिक सुविधा पुरेशा मिळत नाहीत, ग्रामीण विकास झाला तर राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती.ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निःस्वार्थ भावनेने एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ या संस्थेची सामाजिक बांधिलकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आहे. प्रमुख पाहुणे डॉ.पार्श्वनाथ वेळापुरे यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदीसाठी एकूण 27 हजार रुपयांची देणगी देणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231113-WA0027-1024x699.jpg)
संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद यांनी वुई टूगेदर फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखली प्राधिकरणचे सेवेकरी महेश पोळ, संजय हजारे यांनी दिलेल्या दिवाळी फराळ भेटी स्वीकारल्या. जयवंत कुलकर्णी, श्वेता जागीरदार, नागेश कुपडे, मल्लिकार्जुन इंगळे, निलेश कुपडे, पार्श्वनाथ वेळापुरे, रमाकांत उजलांबकर, विलास रासकर, पंढरीनाथ खलाने, स्वाती पाठक, श्रीरंग दाते, दिलीप चासकर, अमित वाघमाले, अर्जुन पाटोळे,सदाशिव गुरव, दिलीप पोरे, चौधरी जी एन, श्रीकांत पाटील, विजय केसकर, श्रीकांत पाटणे, विजय केसकर, यशवंत काकडे, शामराव खोत, शांताराम फेंगसे, कारखानीस, नारायण दीक्षित या देणगीदारांनी एकूण 35 हजार रुपये शालेय साहित्य खरेदीसाठी देणगी दिले. तर स्मिता सस्ते अपंग प्रतिष्ठाण, मोशी यांनी सॅनिटरी पॅडस दिले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231113-WA0026.jpg)
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, चिखली प्राधिकरणचे सेवेकरी महेश पोळ, संजय हजारे यांनी 70 दिवाळी फराळ व मिठाई बॉक्स दिले. खटकाळे गावाचे शिवाजी लोखंडे, नवनाथ मोरे यांनी स्वीकारल्या. श्रीनिवास जोशी, तसेच ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ चे सल्लागार श्री अवधूत कुलकर्णी यांनी ह्या कार्यक्रमासाठी कुठलेही शुल्क न आकारता कार्यालय मोफत उपलब्ध करून दिले,त्याबद्दल सलीम सय्यद यांनी आभार मानले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231113-WA0025-1024x768.jpg)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शंकरराव कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक जयंत कुलकर्णी यांनी केले ,खटकाळे आश्रमशाळेची माहिती नवनाथ मोरे यांनी दिली, साहित्य वाटप जयंत कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन रविंद्र काळे, दिलीप पेटकर, झाकीर शेख, अनिल शिंदे, सुरेंद्र जगताप, राजेंद्र महाले, श्रीरंग दाते, के एस रंगाराव, इकबाल अत्तार, इस्माईल शेख, गुरुराज फडणीस, हनिफ सय्यद, अनिल पोरे, जावेद शेख, परशुराम लगड, श्रीनिवास जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन खजिनदार दिलीप चक्रे यांनी केले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231113-WA0024-1024x768.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231112-WA0039.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231112-WA0041.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231112-WA0040.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231106-WA0024.jpg)
![Don't gift load shedding to citizens in Diwali – Santoshi Nair](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231107-WA0061-737x1024.jpg)