पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.१४ – लातुर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यामधील दलित समाजातील कै.गिरधारी तपघाले व नांदेड मधील कै.अक्षय भालेराव यांना न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील दलित अल्पसंख्याक बहुजन अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्याच्या वतीने शहरातील आंबेडकरवादी, पुरोगामी डाव्या पक्ष संघटनांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातून तहसीलदार कार्यालयावर हजारो मोर्चेकरी अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाळे यांना न्याय मिळालाच पाहिजे, जातीयवादी केंद्र राज्य सरकारचा निषेध असो, जातीयवाद हटवा, मारेकऱ्यांना फाशी द्या अशा मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा पुणे मुंबई महामार्गाने निगडी तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला.
मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समविचारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकल मातंग समाज, छावा युवा मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, भिमशाही युवा संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादीकाँग्रेस, बाराबलुतेदार महासंघ, भारतीय लहुजी पँथर, अपना वतन संघटना, पुना-केरला मुस्लिम जमात,पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटी, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, स्वराज अभियान, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, नागरी हक्क सुरक्षा समिती, संभाजी बिग्रेड, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती मोहत्सव समिती, डी वाय एफ आय, जनवादी महिला संघटना तसेच शहरातील विविध संघटनांनी भाजप सरकारच्या जातीयवादी, धर्मांध विचारसरणी मूळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा निषेध केला.
संजय ससाणे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, युवराज दाखले, मानव कांबळे, अजित गव्हाणे, मारूती भापकर, सचिन चिखले, काशिनाथ नखाते,भास्कर नेटके, अण्णा कसबे, मयुर जाधव, संजय धुतडमल, शिवाजी साळवे, कबीर व्ही एम, विशाल कसबे, सतिश भवाळ, प्रल्हाद कांबळे, किशोर हतागळे, अनिल तांबे, नारायण पवार, संदिप जाधव, विठ्ठल कळसे, अजय खंडागळे, सिद्दीक शेख, प्रताप गुरव, शिवशंकर उबाळे, गणेश दराडे, सतीश काळे, अपर्णा दराडे, नवनाथ शेलार, ॲड.प्रकाश जाधव, अकबर मुल्ला, ऍड.रमेश महाजन, मनीषा महाजन, शिवशंकर उबाळे, वंदना जाधव, महेंद्र गायकवाड, नवनाथ शेलार, अविनाश लांडगे, शिवाजी खडसे, सविता आव्हाड, केशर लांडगे, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल आंबोरे, कदम ताई, विजय उफाडे, लहु आडसुळ, निखील काकडे, मधुकर तोरड, शंकर खवळे, तात्या सोनवणे, स्वप्निल जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल आंबोरे, कदम ताई, विजय उफाडे, लहु आडसुळ, निखील काकडे, मधुकर तोरड, शंकर खवळे, तात्या सोनवणे, स्वप्निल जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
तहसीलदार अर्चना निकम यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. कै.अक्षय भालेराव, कै.गिरीधारी तपघाले, हिना मेश्राम हत्त्याकांड, मुंबई या घटनेतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या निवेदनात म्हटले आहे की, गुन्हा सामाजिक स्वरुपाचा तसेच मानवतेला काळीमा फासणारा असून एस.सी./एस.टी. अॅक्ट १९८९ चे कलम ३ (१) १, ३ (१) ३, ३ (१) ५, ३ (१) ७, ३ (१) ९, ३ (१) १०, ३ (१) ११, ३ (१) १२, ३ (१) १५, ३ (२) ६ ही सर्व कलमे लावण्यात यावीत. २) एस.सी./एस.टी. अॅक्ट १९८९ नुसार कारवाई करून असून नुकसान भरपाई द्यावी.गुन्हा हा संघटीतपणे केला असून अनेकांचा सहभाग आणि पुर्वनियोजत कट दिसून येतो म्हणून आय.पी.सी. १२० व हे कलम लावण्यात यावे.बाबासाहेब आंबेडकर जयंती न होऊ देण्याचा ठराव झाला म्हणजे ग्रामसेवक, बी.डी.ओ. तहसिलदार, पोलीस निरीक्षक एस.पी. जिल्हा अधिकारी यांना त्याची कल्पना होती.त्यांच्या निष्काळजीपणा बद्दल, गुन्ह्यास सहकार्य केल्याबद्दल एस.सी. / एस.टी. अॅक्ट १९८९ प्रमाणे त्यांना सहआरोपी करण्यात यावे.घरातील कर्त्या पुरुषाचा खुन झाल्यामुळे सरकारने घरातील सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे. आदी मागण्या करण्यात आल्या.
भाजप सरकार देशात महाराष्ट्रात, देशात, दलित,अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराची लक्षणीय वाढ झाल्याचा आरोप निगडी येथील जाहीर सभेत वक्त्यांनी केला. लातुर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यामधील मातंग समाजातील कै.गिरधारी तपघाले व नांदेड मधील कै.अक्षय भालेराव यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यसरकार निश्चित प्रयत्न करणार असे आश्वासन तहसिलदार अर्चना निकम यांनी शिष्टमंडळास दिले.
आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्याचा पाहुणचार ; हरिनाम गजरात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे
पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान
सकल मातंग समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने वंचित जाती हक्क परिषद संपन्न