पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रिक्षा टॅक्सीसह इतर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी (Fitness certificate) विलंब शुल्क म्हणून रोज पन्नास रुपये आकारण्यास पुन्हा सुरवात झाली आहे. वेळेत पासिंग न केल्यामुळे फिटनेस साठी प्रत्येक दिवशी पन्नास रुपये दंड सरकारच्या वतीने जाहीर केला आहे, असा आदेश देखील नुकताच परिवहन आयुक्तानी (RTO) यांनी काढला असून महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयामध्ये मध्ये अशा स्वरूपाचा दंड घेणे सुरू झाले आहे. PCMC
या विलंब शुल्क (daily penalty) अथवा अशा प्रकारच्या दंडास रिक्षा,टॅक्सी संघटनांचा तीव्र विरोध आहे. असे ऑटो कृती समितीचे महाराष्ट्राचे नेते व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे (Baba kambale) यांनी सांगितले.
या विरोधात पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या आठ दिवसांमध्ये हा दंड रद्द करावा अन्यथा पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून महाराष्ट्रभर चक्का जाम करू, असा इशारा ऑटो कृती समितीचे महाराष्ट्राचे नेते व महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. (Pune pcmc)
यावेळी मनसे वाहतूक विभागाचे पुणे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी, पुणे रिक्षा फेडरेशन अध्यक्ष आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर, उपाध्यक्ष आबा बाबर, भाजप रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झाडे, सावकाश रिक्षा संघ अध्यक्ष प्रदीप भालेराव, आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल, राष्ट्रवादी रिक्षा संघटना पुणे शहराध्यक्ष बापू धुमाळ, एम आय एम रिक्षा संघटना कार्याध्यक्ष महमूद शेख, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख, कृती समिती समन्वय तुषार पवार, विलास खेमसे, कुमार शेट्टी, सुनील मालुसरे, आधी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. pune pcmc news
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, पुणे शहरांमध्ये एका बिल्डराच्या मुलाने पार्श गाडीखाली चिल्ड्रन दोन व्यक्तींना जीवे मारले अशावेळी, श्रीमंत बिल्डरचा मुलगा आहे म्हणून त्याच फक्त निबंध लिहण्याची शिक्षा देण्यात आले, आणि हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब रिक्षा चालकांना मात्र लेट पासिंग केली, म्हणून लाखो रुपये दंड लावण्यात येत आहे. daily penalty
अनेक रिक्षा चालकांना एक लाखापेक्षा अधिक दंड आला आहे, रिक्षाच्या किमतीपेक्षा अधिक हा धंदा असून एवढ्या मोठा दंड भरायचा कसा? असा प्रश्न रिक्षा चालकांसमोर आहे, हा सर्व प्रकार चिड असून सरकारी कुणासाठी चालवलं जात आहे असा प्रश्न पडत आहे.
या प्रश्नांबाबत महाराष्ट्रातील वीस लाख ऑटो चालक मालकांच्या भावना तीव्र असून महाराष्ट्रातील प्रत्येक आरटीओला विविध संघटनांनी निवेदन देण्यात आले आहे, येत्या आठ दिवसांमध्ये हा प्रश्न न सुटल्यास पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून चक्का जाम करण्यात येईल, असा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.


हेही वाचा :
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी