Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरावी – गजाला सय्यद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ४ हजार ६४८ रिक्त पदे आहेत. ती लवकरात लवकर भरण्यात यावी, ही पदे अजूनही भरली गेली नाही. यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर देखील होत आहे. सर्वसामान्यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत, त्यामुळे सदर रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी शमीम हुसेन फाउंडेशन अध्यक्षा, पत्रकार गजाला सय्यद यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (PCMC)

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ४ हजार ६४८ रिक्त पदे आहेत. ती लवकरात लवकर भरण्यात यावी, ही पदे अजूनही भरली गेली नाही. यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर देखील होत आहे. सर्वसामान्यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

महापालिकेच्या नवीन आकृती बंधानुसार एकूण ११ हजार ५१५ पदे मंजूर आहेत, त्यापैकी केवळ ६ हजार ८६७ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. दर महिन्यात किमान २० ते २५ अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत, त्या जागेवर नोकरी भरती होत असल्याने अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. आतापर्यंत विविध विभागातील तब्बल 4 हजार ६६८ जागा रिक्त आहेत, त्या त्वरित भरण्यात यावे. (PCMC)

जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही. विविध विभागातील सदर पदे रिक्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे.

याकरिता सदर रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावे,” असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles