पिंपरी चिंचवड – रूपगंधा हा काव्यसंग्रह प्रकाशित होऊन ज्यांनी कमी वयामध्ये साहित्यात प्रगती केली आणि महाराष्ट्रात नावाजले जाऊ लागले त्यानंतर एल्गार, रंग माझा वेगळा, झंजावात इत्यादी संग्रह प्रकाशित झाल्यानंतर प्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार सुरेश भट हे नाव आजारावर झाले. उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..! हे मशाली पेटवून सामान्य नागरिक वंचित आणि कामगारांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे काम सुरेश भट यांनी केले, असे मत कामगार नेते काशिनाथ यांनी व्यक्त केले. (PCMC)
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे गझलकार सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, सलीम डांगे, सुनील भोसले, विजय बिराजदार , संजय कदम, अनिता पवार, काजल कोरे, अनिता मोरे, ललिता जाधव उपस्थित होते.
भट यांच्या हळुवार आणि मृदू असणाऱ्या कविता अनेक वेळा बाणाच्या टोकासारख्या आणि तितक्याच उपरोधक कविता आहेत, चल उठ रे मुकुंदा, आज गोकुळात रंग यातून भक्तीभाव दिसतो. (PCMC)
उभा देश झाला आता एक बंदिशाळा, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला..
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली
उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! (PCMC)
या त्यांच्या शब्दातून व्यक्त होणारे समाजातील मूल्यहीनता आणि संकटे आपल्या नजरेसमोर येतात. त्यांनी असंख्य गझल कविता आणि गाण्यातून महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : गीतकार, गझलकार सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
---Advertisement---
- Advertisement -